शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:00 IST

सोळांकूर : विधानसभेसाठी राष्टÑवादी पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी पक्ष पातळीवर दोघांनी परस्पर रणनिती आखली आहे. तशी स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबत असून सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला गेला आहे. याची कल्पना आमदार हसन मुश्रीफ यांना असताना त्यांनी कसबा वाळवे येथील कार्यक्रमात के. पी. ...

सोळांकूर : विधानसभेसाठी राष्टÑवादी पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी पक्ष पातळीवर दोघांनी परस्पर रणनिती आखली आहे. तशी स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबत असून सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला गेला आहे. याची कल्पना आमदार हसन मुश्रीफ यांना असताना त्यांनी कसबा वाळवे येथील कार्यक्रमात के. पी. पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्याने ए. वाय. यांच्या समर्थकांमध्ये याचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत.युवा वर्गात ए. वाय. यांची क्रेझ निर्माण झाली असून, सोशल मिडियाच्या माध्यमातून आगामी विधानसभा ए. वाय. लढणार म्हणजे लढवणार, उद्याचे भावी आमदार ओनली ए. वाय. आता माघार नाही. अशा आशयाच्या प्रतिक्रियांना ऊत आला आहे.नुकत्याच झालेल्या भोगावती साखर कारखान्याच्या वर्चस्वावरून दोघात मतभेद झाले. भोगावतीचे माजी अध्यक्ष व के. पी. यांचे जावई धैर्यशील पाटील-कौलवकर यांना तालुक्यात पुढे जाण्याच्या हालचाली झाल्या. तसेच पॅनेलची रचना करताना आपणास विचारात न घेतल्याचे व निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने कारण पुढे करत ए. वाय पाटील यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. राष्टÑवादीचा पराभवाचा फटका बसला ही सल के. पी. पाटील व धैर्यशील पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना टोचत आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे एकमेकांची उणीदुणी काही कार्यक्रमात व्यक्त करत आहेत. विद्यमान आमदार यांच्यावर लक्ष केंद्रीत न करता दोघे परस्परांस विरोधक समजत आहेत. राधानगरीतून विधानसभेसाठी धैर्यशील पाटील यांना इच्छुक करण्यात के. पी. यांचा हात असावा, तर भुदरगडमधून जि.प. सदस्य जीवन पाटील यांना इच्छुक करण्यात ए. वाय. यांचा हात असावा असा आरोप एकमेकांकडून होत आहे.ए. वाय. पाटील शांत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून चर्चेला उधाण आणले आहे. साहेब कोणी काहीही म्हणो, आता थांबायचं नाही, वरिष्ठांनी केलेल्या वक्तव्याकडे कानाडोळा करून कोणावर कोणतीही टीका करू नका, संयम बाळगा असा संदेश पाठवले आहेत. आपण विधानसभा लढणारच आहोत, असे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे राजकीय वाद तीव्र झाला आहे.सबुरीने राहण्याचा सल्लाए. वाय. व के. पी. यांची धुसफूस पक्षाला अडचण ठरणार असल्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सबुरीने राहण्याचा सल्ला दिला आहे. जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून पुन्हा एकदा ए. वाय. यांची राजकीय ताकद वाढवली आहे. कसबा वाळवे येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार मुश्रीफ यांनी अनुभव व ज्येष्ठतेनुसार विधानसभेसाठी के. पी. पाटील यांचे समर्थन केल्याने ए. वाय. पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. याबाबत ए. वाय. पाटील यांनी मौन पाळले आहे.