शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: September 21, 2015 00:07 IST

वाळवा पंचायत समिती : वसंतदादांच्या प्रेमापोटी काँग्रेससह विरोधी पक्ष एकवटणार

अशोक पाटील --इस्लामपूर   --माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या बगलबच्च्यांनी पक्षाची ताकद आणि आर्थिक जोरावर वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा घाट घातला आहे, तर जुन्या सभागृहाला असलेले वसंतदादा पाटील यांचे नाव गायब करण्याचा कटही राष्ट्रवादीने आखला आहे. त्याविरोधात काँग्रेससह सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन लढा देण्याचा इशारा काँग्रेसचे पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीची हुकूमशाही सुरू आहे. ताकदीच्या जिवावर स्वत:ची मालमत्ता समजून नामांतराचा ठराव करणाऱ्यांविरोधात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, काँग्रेसचे नानासाहेब महाडिक, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांच्यासह हुतात्मा गटाचे युवा नेते, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी एकत्र येऊन सभागृहाच्या नामांतराला विरोध करणार आहेत.मुळातच तालुका पंचायत समितीची मालमत्ता ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. नामांतरासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच तसा ठरावही सभागृहाच्या बैठकीत होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव बेकायदेशीर आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयात अधिकारी व सदस्यांसाठी वातानुकूलित खोल्या बांधण्यात आल्या आहेत, तर विरोधकांसाठी कसलीही व्यवस्था नाही. सर्वसामान्य जनतेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्या पावसाअभावी पिकांची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तालुक्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. याचा कसलाही विचार न करता सत्ताधारी राष्ट्रवादीला सभागृहाच्या नामांतराचाच प्रश्न महत्त्वाचा वाटत आहे, असाही आरोप पाटील यांनी केला आहे.एकंदरीत नामांतराचा वाद चांगलाच पेटणार असून, राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नामांतराचा हा मुद्दा येथील राजकीय पटावर आता चांगलाच रंगणार आहे. शिष्टाचार गेला, राजकारण आले...वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील तत्कालीन वादाची, संघर्षाची छाया त्यांच्या पुढील पिढीतही कायम राहिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतही महापौर कार्यालयात यापूर्वी राजारामबापू पाटील यांची प्रतिमा लावण्यात आली होती. गत निवडणुकीत सत्ताबदल झाला. पण गेल्या दीड वर्षात महापौर कार्यालयातील प्रतिमा बदलल्या नव्हत्या. नुकतेच महापौर कार्यालयाचे नूतनीकरण झाले. त्यानंतर राजारामबापूंच्या प्रतिमेची जागा आता विष्णुअण्णा पाटील यांच्या प्रतिमेने घेतली आहे.वसंतदादा पाटील हे जिल्ह्याचे भाग्यविधाते आहेत. अशा या थोर नेत्याचे सभागृहाला दिलेले नाव बदलणे हे चुकीचे आहे. राष्ट्रवादीने नाव बदलण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात काँग्रेसचे नेते एकत्र येऊन आंदोलन करतील.- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, बोरगाव.पंचायत समिती ही शासकीय स्वायत्तता आहे. याठिकाणी नेत्यांचे नाव देणे योग्य होणार नाही. सत्ता बदलली की नाव बदलण्याचा पायंडा चुकीचा आहे. त्यामुळे शासकीय इमारतीला नावे देतानाच विचार होणे गरजेचे आहे. - राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य, येलूर.