शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीविरोधात इस्लामपूर मंगळवारी बंद

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

व्यापाऱ्यांतून नाराजीचा सूर : घरपट्टी अवास्तव असल्याचा नगराध्यक्षांनीच दिला घरचा अहेर

अशोक पाटील - इस्लामपूर  शहरातील मालमत्तेचा नाशिक येथील स्थापत्य कन्सल्टने सर्व्हे केला आहे. याच सर्व्हेवरून नगरविकास खात्याने अवास्तव घरपट्टी आकारल्याची कबुली खुद्द नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी देऊन सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. तसेच भाजपचे विक्रमभाऊ पाटील, विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी घरपट्टीविरोधात मंगळवारी इस्लामपूर बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर आहे.इस्लामपूर पालिकेने अवास्तव घरपट्टी आकारुन मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे मालमत्ताधारक हवालदिल झाले आहेत. स्वत:च्या घरात राहण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे परवडेल, अशीच प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहे. तसेच स्वत: नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हे अन्यायी घरपट्टी आकारल्याची कबुली देत, आम्ही ती कमी करणार असल्याची ग्वाही देत आहेत. तसेच दुसरीकडे विरोधक या अन्यायी घरपट्टीविरोधात इस्लामपूर बंदची हाक देऊन व्यापाऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.इस्लामपूर शहरातील नियोजित विकास आराखड्याचा अजूनही पत्ता नाही. गुंठेवारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एका भूखंडाची खरेदी चार-चार वेळा केल्याचीही प्रकरणे उघड झाली आहेत. विनापरवाना हजारो बांधकामे करण्यात आली आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासाठी शासकीय कार्यालयातून हजारो रुपये उकळले जात आहेत. या संकटातून मालमत्ताधारक बाहेर पडण्याअगोदरच इस्लामपूर पालिकेने चौपट घरपट्टी केल्याचा दावा विरोधक करीत आहेत. तसेच सत्ताधारी मंडळी घरपट्टी कमी करण्यासाठी अपील फॉर्म दाखल करण्याच्या तयारीला लागली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने सर्वसामान्य व व्यापारी वेठीस धरले गेले आहेत. त्यातच कोणत्याही कारणासाठी शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांना वेठीस धरले जाते. बंद हा प्रत्येक प्रश्नावरील पर्याय नव्हे, अशीच संतप्त प्रतिक्रिया व्यापारी व सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.राष्ट्रवादीने इस्लामपुरात विकासाची गंगा आणली आहे. मालमत्तेची फेरमोजणी नाशिक येथील स्थापत्य कन्सल्टने केली आहे. या कंपनीच्या शिफारशीनुसार नगरविकास खात्याने अवास्तव घरपट्टी आकारली आहे. ही घरपट्टी कमी करण्यासाठी आमचे नगरसेवक कामाला लागले आहेत. इस्लामपूर बंद हा पर्याय नसून व्यापारी व नागरिकांना वेठीस धरु नये.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्षइस्लामपूर पालिकेने मालमत्ताधारकांना नियमबाह्य नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये ५ हजार मालमत्ताधारकांचा समावेश आहे. १३ हजार मालमत्ताधारकांनाही नोटिसा देण्यात येणार आहेत. अगोदरच सर्वसामान्य नागरिक गुंठेवारी नियमित करण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यातच अवास्तव घरपट्टी आकारल्याने नागरिकांना स्वत:च्या घरात राहणेही मुश्कील होईल.- विक्रमभाऊ पाटील,प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमोनागरिक, व्यापारी नाहक वेठीस...इस्लामपूर पालिकेने अवास्तव घरपट्टी आकारुन मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे मालमत्ताधारक हवालदिल झाले आहेत. शहरातील नागरिकांचा संताप पाहून सत्ताधारी ही घरपट्टी कमी करण्याची ग्वाही देत आहेत. तर दुसरीकडे विरोधक या घरपट्टीविरोधात शहर बंदची हाक देऊन नागरिकांसह व्यापाऱ्यांना वेठीस धरत आहेत.