शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्ची’साठी इस्लामपूरकर ‘सैराट’

By admin | Updated: August 2, 2016 01:19 IST

अंबाबाई उद्यानाचे उद्घाटन : रिंकूसारखे बना, पण अभ्यास करा : अण्णासाहेब डांगे

इस्लामपूर : शहरात ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू येणार म्हटल्यावर अंबाबाई उद्यान परिसरात दुपारी एकपासून हजारो तरुण-तरुणी सैराट झाल्या होत्या. तब्बल दोन तास उशिरा येऊनही आणि भरपावसातही इस्लामपूर पालिकेने तयार केलेल्या अंबाबाई उद्यानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सैराट झालेल्या तरुणाईला रिंकूसारखे बना, पण अभ्यास करा, असा सल्ला दिला. आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘सैराट’फेम रिंकू येणार म्हटल्यावर इस्लामपूर शहरच सैराट झाले आहे. नागरिकांनी या उद्यानाचा लाभ घ्यावा. शहरामध्ये विविध विकासकामे करण्याचा आमचा संकल्प आहे.पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील म्हणाले, या उद्यानाचे आपण लोकार्पण करत आहोत. या उद्यानासाठी चार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यासाठी नाममात्र तिकीट दर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.अभिनेत्री रिंकू राजगुरुने उद्यानाचे कौतुक करुन अभिनयाबरोबर स्वत:चे शिक्षणही पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी विजयभाऊ पाटील, माजी नगरसेवक विजय कोळेकर आणि उद्यानाचे काम करणारे ठेकेदार यांचा सत्कार आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.नियोजन समिती सभापती खंडेराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक शहाजीबापू पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, चंद्रकांत पाटील, शंकर चव्हाण, पीरअल्ली पुणेकर, मिनाज मुल्ला उपस्थित होते. (प्रतिनिधी)पावसाचा जोर : उत्साहावर विरजणइस्लामपुरातील अंबिका उद्यान उद्घाटनासाठी आर्ची येणार म्हटल्यावर तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु ऐन कार्यक्रमापूर्वी पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम १0 ते १५ मिनिटातच आटोपता घेण्यात आला. त्यामुळे तरुणांच्या उत्साहावर विरजण पडले. यावेळी गर्दीमुळे नागरिकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली.