शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

पाटबंधारेचे अधिकारी कर्नाटकचे हस्तक

By admin | Updated: November 23, 2015 00:05 IST

हसन मुश्रीफ : चिकोत्रा धरण भरण्यासाठी योजना

मुरगूड : काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला पाणी मिळाले पाहिजे. कर्नाटकला त्यांच्या वाटणीचे पाणी देण्यास कुणाचाच विरोध नाही; पण पाटबंधारे विभागातील अधिकारी अधिक मेहरबान होऊन महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकला जास्त पाणी देत आहेत यामागचे गौडबंगाल शोधले पाहिजे. असे प्रकार यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. मुरगूड (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळम्मावाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पाणी असूनही कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, याला पाटबंधारे विभागच जबाबदार आहे. धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडले पाहिजे आणि शेतकऱ्यांनीही ते जपून वापरले पाहिजे. काळम्मावाडीच्या दोन्ही कालव्यांकडे यावेळी अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे सांगून काही ठिकाणी दरडी कोसळल्या, झुडपे वाढलेली व गाळ साचला आहे. यांत्रिकी विभागाने कालवा दुरुस्त केला नसल्याने पाणी पुढे सरकलेच नाही. परिणामी, म्हाकवे भागातील पिके वाळली आहेत. पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हे झाले आहे असून यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. चिकोत्रा प्रकल्पामध्येही कमी पावसामुळे ४६ टक्के इतकाच पाणी साठा आहे. यामुळे या संपूर्ण खोऱ्यात पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. उत्तूर, सेनापती कापशी परिसरातील हातातोंडाला आलेली पिके वाळून जात आहेत. त्यामुळे प्राधान्याने या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी चिकोत्रा धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नागनवाडी व आंबेओहळ हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्थांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबरला पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. चिकोत्रा धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी भुदरगड तालुक्यातील म्हातारीच्या पठारावारील पश्चिम वाहिनी ओढ्याचा मार्ग बदलण्यासाठी २५० मीटर लांब व अडीच मीटर उंच असा बांध घालून हे पाणी चिकोत्रा धरणात सोडण्याची योजना झाली आहे. या कामाचा प्रारंभ २५ नोव्हेंबरला आमदार प्रकाश आबिटकर व आपल्या उपस्थित होणार आहे. या पत्रकार परिषदेत रणजित सूर्यवंशी, परेश चौगले, महादेव हळदकर, माजी उपनगराध्यक्ष शामराव चौगले, किरण पाटील, विजय हुल्ले, दगडू किल्लेदार, दिगंबर परीट, दत्तात्रय हासबे, देवानंद पाटील, एकनाथ हासबे, एम. डी. रावण, आदी प्रमुख उपस्थित होते.