शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्ववादातून इरफान मुल्लाचा खून; चौघांना अटक

By admin | Updated: September 28, 2014 00:51 IST

आरोपींना हद्दपार करण्याची मागणी : संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

कोल्हापूर : दोन गटांमधील वर्चस्ववादातून इरफान आदम मुल्ला (वय २६, रा. साळोखे पार्क) याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी चौघा संशयितांना आज, शनिवारी अटक केली. पुंडलिक साताप्पा बांदिवडेकर (वय ६६), सनीराम साळे (२४), स्वरूप विजय दळवी (२७), उत्तम तानाजी पाटील (२७, सर्व रा. साळोखे पार्क) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, गुंड प्रवृत्तीच्या बांदिवडेकर कुटुंबीयांना परिसरातून कायमचे हद्दपार करावे, या मागणीसाठी साळोखे पार्क येथील दोनशे महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले. साळोखे पार्क येथील दोन मंडळांत झालेल्या वादामधून घरामध्ये घुसून इरफान मुल्ला याचा खून करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर संशयित हल्लेखोर पसार झाले होते. मृत मुल्ला याचा भाऊ इर्शाद व नातेवाइकांनी विक्रम पुंडलिक बांदिवडेकर, विश्वास पुंडलिक बांदिवडेकर, सनी साळे, स्वरूप दळवी, उत्तम पाटील, मंजुनाथ गंगापोळ, कुमार गंगापोळ या सातजणांवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांचे अन्य साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी दिली. सनी साळे हा ‘आरसी गँग’चा सदस्य असून, त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असल्याचे समजते. दरम्यान, गुंड बांदिवडेकर बंंधू बाहेरील गुंड आणून दहशत माजवीत आहेत. दादागिरीच्या जोरावर त्यांनी सामान्य लोकांचे जीवन हैराण करून टाकले आहे. या गुंडांना परिसरातून कायमचे हद्दपार करावे, देवीचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी संतप्त महिलांनी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडे केली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिल्यानंतर महिला माघारी परतल्या. मोर्चामध्ये राजश्री सोळंकी, मेहबूब तासेवाले, कमल गुंजीकर, शकुंतला सुतार, विजया बोडके, ज्योती माने, दीपाली माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)