शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणी टोळीचा चेन स्नॅचर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

कोल्हापूर : महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळालेल्या इराणी टोळीतील दुचाकीस्वार चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ...

कोल्हापूर : महाडिक वसाहत येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळालेल्या इराणी टोळीतील दुचाकीस्वार चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपूर येथे अटक केली. मोहमद फिरोज इराणी (वय २१, रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, रेल्वे स्टेशन, सांगली. मूळगाव- जन्नतनगर, धारवाड, रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या चेन स्नॅचरचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा दुसरा साथीदार दादू राजहुसेन इराणी (रा. खाजा वस्ती, इराणी चाळ, सांगली) हा अद्याप फरारी आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १५ मार्च रोजी सकाळी इंदूबाई बाळासाहेब समुद्रे (वय ५०, रा. विक्रमनगर) या कामानिमित्त महाडिक वसाहत येते जाताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून नेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. गुन्हा करताना चोरट्यांनी वापरलेली दुचाकी जयसिंगपूर येथे घेऊन चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते उदगाव या मार्गावर सापळा रचला. त्यावेळी त्याच वर्णनाची दुचाकी घेऊन येणाऱ्यास पोलिसांनी अडवले. दुचाकीबाबत खात्री करुन दुचाकीस्वार मोहमद इराणी याला ताब्यात घेतले. त्याने कोल्हापुरात महाडिक वसाहत येथे चेन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याचे कबूल केले, त्याच्याकडून चोरलेली सोन्याची चेन व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा साथीदार दादू इराणी हा अद्याप फरारी आहे. त्याचा शोध सुरु आहे.

दुचाकी ठाणे येथून चोरली

अटक केलेल्या मोहमद इराणी याच्याकडे मिळालेली दुचाकी त्याने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

फोटो नं.२९०३२०२१-कोल-चोरी

ओळ : कोल्हापुरात महाडिक वसाहतमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जयसिंगपुरात अटक केली.