शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’च्या अन्य तिघांचीही चौकशी

By admin | Updated: March 3, 2017 00:48 IST

पानसरे हत्या प्रकरण; महत्त्वाची माहिती ‘एसआयटी’च्या हाती?

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ‘एसआयटी’च्या पथकाने सनातन संस्थेच्या कारभार पाहणारे दुर्गेश सामंत, पांडुरंग मराठे आणि वीरेंद्र मराठे यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती ‘एसआयटी’च्या हाती लागली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. गोवा (रामनाथी) येथील आश्रमात जाऊन फरार आरोपींबाबत पोलिसांनी संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांच्यासह संस्थेच्या विश्वस्तांची चौकशी केली आहे.पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेतील काही लोक असल्याची शंका व्यक्त करून या संस्थेची चौकशी करण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे. पानसरे हत्त्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले दोन्ही संशयित समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे सनातन संस्थेशी संबंधित आहेत. फरार आरोपींपैकी संशयित सारंग दिलीप अकोलकर (वय ३५, रा. पुणे) आणि विनय बाबूराव पवार (३७, रा. उंब्रज, जि. सातारा) हेदेखील सनातन संस्थेतील साधक होते. हे दोघे ‘सनातन’च्या गोव्यातील आश्रमात वास्तव्यास होते. या दोघांनीच या खून प्रकरणात पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे व तसा उल्लेख पुरवणी दोषारोपपत्रातही आहे; परंतु हे दोघे सुमारे आठ वर्षांपासून फरार आहेत.याबाबत तपास अधिकारी सुहेल शर्मा यांच्या पथकाने २८ फेब्रुवारी व बुधवारी (ता. १) सलग दोन दिवस ‘सनातन’च्या गोवा (रामनाथी) येथील आश्रमात जाऊन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांची तसेच रामनाथी आश्रमाचा कारभार पाहणारे दुर्गेश सामंत, पांडुरंग मराठे आणि संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांचीदेखील पोलिसांनी चौकशी केली. फरार आरोपी पवार आणि अकोलकर यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या चौकशीदरम्यान काही ठोस माहिती हाती लागल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही माहिती न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा चौकशी अहवाल एसआयटी प्रमुख संजयकुमार यांच्याकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.इन कॅमेरा चौकशी...पानसरे हत्येबाबत सुरुवातीपासूनच सनातन संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चौकशीच्या नावाखाली साधकांचा छळ होत असल्याचीही तक्रार संस्थेकडून होत आहे. संस्थेचे प्रमुख आठवले यांच्या चौकशीनंतरही अशीच तक्रार करण्याची संधी संस्थेला मिळू नये, यासाठी गोव्यातील स्थानिक पोलिसांसह पंचांसमक्ष संपूर्ण चौकशी इन कॅमेरा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.पानसरे हत्येतील संशयित फरार आरोपींची माहिती मिळविण्यासाठी ‘सनातन’च्या गोव्यातील आश्रमात चौकशी केली आहे. जयंत आठवले यांच्यासह आश्रमाच्या इतर प्रमुखांच्या चौकशीतून मिळालेली माहिती न्यायालयात सादर करू.- संजयकुमार, एसआयटी प्रमुख