आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : ‘द लीजंड आॅफ पद्मावती’या िचित्रपटातील सेट पेटविल्याप्रकरणी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली आहेत. अज्ञातांनी पेट्रोल कोठून आणले, ही आग लागली की लावली या दृष्टिने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पन्हाळा पोलिस तपास करीत आहेत, मात्र, म्हणावे तसे धागेदोरे पोलिसांच्या हाती गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडलेले नव्हते.कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘द लीजंड आॅफ पद्मावती’या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. त्यासाठी अनेक किंमती साहित्य पठारावर आणले होते. मंगळवारी (दि. १४) रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब टाकून हे साहित्य पेटविले. यामध्ये कोटीचे नुकसान झाले. या प्रकाराने बुधवारी एकच खळबळ उडाली. गुरुवारी दिवसभर पोलिस सर्वपातळीवर तपास करीत आहेत. परंतु, म्हणावे तसे धागेदोरे सापडलेले नव्हते.याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनीही तपासात प्रगती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘द लीजंड आॅफ पद्मावती’च्या सेट जाळल्याप्रकरणी तपास संथ
By admin | Updated: March 16, 2017 18:15 IST