शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने विक्रीची चौकशी करा

By admin | Updated: April 29, 2016 00:48 IST

राजू शेट्टींची लोकसभेत मागणी : अधिवेशनात ‘शून्य प्रहर’मध्ये वेधले लक्ष

कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल किमतीत करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी सक्त वसुली संचालनालय (ईडी)तर्फे करावी, अशी मागणी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहर वेळेत केली. विदेशातील काळा पैसा कधी आणायचा तेव्हा आणा. मात्र, देशातील पांढऱ्या कपड्यात लपलेल्या दरोडेखोरांचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योगांमुळे अनेकांना वर्षातून १५० ते १७० दिवस रोजगार मिळतो. तीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस पुरवठा करतो. शेतकऱ्यांच्या पैशांतून सहकारी साखर कारखाने उभारले. मात्र, गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने आजारी पडले. कर्जे थकल्याने राज्य बँक, जिल्हा बँक, राज्य शासनाने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत कब्जा घेऊन विकले. एक साखर कारखाना उभारण्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्षात ३५ आजारी सहकारी कारखान्यांची किमत दहा हजार कोटींपेक्षा अधिक होते. मात्र, काही राजकीय नेते स्वत:च्या फायद्यासाठी आजारी साखर कारखाने केवळ १४ ते ५० कोटी रुपयांपर्यंत लिलावात काढले. अशाप्रकारे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखाने केवळ १ हजार ७६ कोटी रुपयांना विकले आहेत. विक्रीतील कारखाने ज्या खासगी कंपन्यांनी खरेदी केली आहे. त्यांचे संचालक कोण आहेत ?, भागधारक कोण आहेत ?, खरेदीसाठी पैसा कुठून आणला ? त्याची चौकशी ‘ईडी’तर्फे करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. (प्रतिनिधी) अनेक सहकारी सूतगिरण्या, कृषी प्रक्रिया उद्योग यांची खरेदी-विक्री झाली आहे. त्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर झाला आहे. त्याची ‘ईडी’तर्फे चौकशी करून संबंधित सहकारी संस्थांच्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा.- राजू शेट्टी, खासदार