शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्केटिंग संघटनेच्या कारभाराची चौकशी करा-- पॅरेंट्स असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:12 IST

कोल्हापूर : अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन ही स्केटिंगची जिल्हा संघटना म्हणून कार्यरत आहे.

ठळक मुद्दे: जिल्हा प्रशासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन ही स्केटिंगची जिल्हा संघटना म्हणून कार्यरत आहे. मात्र या संघटनेच्या मनमानी कारभारामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. संघटनेच्या भोंगळ कारभाराचा फटका खेळाडूंना बसत असल्याने, या संघटनेची सखोल चौकशी करून तिची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस पॅरेंट्स असोसिएशनतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन असोसिएशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. शिंदे यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्निल पार्टे म्हणाले, अमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव महेश जाधव या एकाच व्यक्तीच्या हातात संघटना केंद्रित आहे. जाधव यांनी अनेक खेळाडूंना चार ते पाच वर्षांपासूनची प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. शालेय स्पर्धा व फेडरेशन स्पर्धा निकालामध्ये पूर्वग्रहदूषित हेतुपुरस्पर फेरफार करून चांगल्या खेळाडूंचे खच्चीकरण करतात. त्यामुळे सर्व कारभार सुधारण्याची गरज आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी, शासकीय स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. मोर्चामध्ये प्रशिक्षक सुहास कारेकर, सचिन इंगवले, जयराम जाधव, उत्तमसिंग रजपूत, सचिन नाईक, सुनील खोत, साफिया मुल्ला, सूरज शिंदे, अरुण पोवार, शैलेश डिचोलकर यांच्यासह पालक, प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.जिल्हा क्रीडाधिकारी लक्ष देत नाहीतजिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांच्याकडे वारंवार याबाबत तक्रार करूनसुद्धा ते दखल घेत नाहीत. स्केटिंग स्पर्धांतील वादामुळे जिल्हा क्रीडाधिकारी यांनी शालेय क्रीडा स्पर्धेवेळी उपस्थित राहणे गरजेचे असताना ते हजर राहत नाहीत. त्यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा त्यांनी कारवाई केली नसल्याने नाइलाजास्तव आम्हाला तुमच्याकडे यावे लागले, असे पालकांनी सांगितले.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् पॅरेंट्स असोसिएशनतर्फे बुधवारी जिल्हा स्केटिंग संघटनेच्या मनमानी कारभाराविरोधात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.