शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कुलसचिवपदासाठी १९ नोव्हेंबरला मुलाखती

By admin | Updated: October 27, 2015 00:52 IST

लोकमत इम्पॅक्ट : निवड समितीचा निर्णय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची प्रशासकीय बाजू कुलसचिवपदाच्या माध्यमातून सांभाळली जाते. या पदाची अंतिम निवड प्रक्रिया १९ नोव्हेंबरला होणार आहे. याबाबतचा निर्णय कुलसचिव निवड समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.कुलसचिव पदासाठीच्या दाखल झालेल्या अर्जांची प्राथमिक टप्प्यातील छाननी होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मुलाखतीची प्रक्रिया जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला कुलसचिव निवडीला मुहूर्त कधी सापडणार? या बातमीद्वारे ‘लोकमत’ने रविवारच्या (दि. २५) अंकात निवड प्रक्रियेतील दिरंगाई मांडली होती. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सोमवारी कुलसचिव निवड समितीची बैठक घेतली. यात कुलसचिवपदासाठी अर्ज दाखल केलेल्या २३ उमेदवारांच्या अंतिम मुलाखतीची प्रक्रिया १९ नोव्हेंबरला राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, संबंधित पदासाठी २३ अर्ज दाखल झाले. त्यात विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’चे माजी संचालक डॉ. ए. बी. राजगे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य एल. जी. जाधव, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. वासंती रासम, भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. व्ही. जे. फुलारी, दूर शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. नितीन सोनजे, राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, ‘केआयटी’ कॉलेजचे प्रा. जय बागी, मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव दिनेश कांबळे, पुण्यातील एम. आर. देशपांडे, आदींचा समावेश असल्याचे समजते.या पदाच्या निवड प्रक्रियेत कायदेशीर बाबी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात. त्यानुसार निवड समितीने प्रक्रिया राबविली आहे. अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम मुलाखतीची प्रक्रिया १९ नोव्हेंबरला राबविण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.- कुलगुरू देवानंद शिंदे