शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुपदासाठी अकरा जणांच्या मुलाखती

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

शिवाजी विद्यापीठ : त्रिसदस्यीय समितीकडून मुंबईत प्रक्रिया

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मुलाखतीच्या पहिल्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहामध्ये दिवसभरात अकरा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज, शुक्रवारी उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती होतील. कुलपती नियुक्त त्रिसदस्यीय समितीकडून मुलाखती घेण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया कुलपती नियुक्त त्रिसदस्यीय समितीतर्फे पूर्ण करण्यात येत आहे. त्यात अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांचा, तर उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे, विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीकडे देशभरातून शंभराहून अधिक अर्ज दाखल होते. त्यांची छाननी करून समितीने मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यासाठी १५ उमेदवारांची निवड केली. मुलाखतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात त्याची सुरुवात गुरुवारी झाली. गुरुवारी दिवसभरात दोन सत्रांत ११ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यात सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडपर्यंत पुणे विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक व्ही. बी. गायकवाड, भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. नितीन करमळकर, औरंगाबादमधील देवानंद शिंदे, डॉ. के. व्ही. काळे, श्रीनिवास ओमणवार, पी. जी. येवले यांचा तर दुपारी दीडनंतर शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम. बी. देशमुख, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. पी. गोविंदवार, डॉ. नामदेव कल्याणकर, विनायक भिसे, पी. पी. माहुलकर यांच्या मुलाखती झाल्या. उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी सकाळी होतील. त्यात डॉ. किशोर आडाव्ह, सोलापूरचे डॉ. एल. बी. देशमुख, एम. एच. फुलेकर, प्रदीप खोत यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातून अंतिम मुलाखतीसाठी पाच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अंतिम मुलाखतीची प्रक्रिया शनिवारी (दि. ६) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)मुलाखतीसाठी ३० मिनिटांचा वेळसमितीने प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी ३० मिनिटांचा वेळ दिला होता. त्यात विद्यापीठाच्या विकासाबाबतच्या योजना, नवी संकल्पना आणि व्हिजन याबाबत उमेदवारांशी समिती सदस्यांनी चर्चा केली.