शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

इंटरनेट अन् श्वास... दृष्टिक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:59 IST

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट ...

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.

यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट बंदी लावण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले. त्यामुळे अफवांचा बाजार कमी झाला. स्थिती पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. असे असले तरी नेटीझन्सची मात्र मोठी पंचाईत झाली. प्रेयसीच्या ओढीने ज्याप्रमाणे प्रियकर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे नेटीझन्स कधी एकदा इंटरनेट चालू होते याची वाट पाहत होते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झाकेपर्यंत सतत व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईटवर डोकावणाºयांना दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. जणू आमचा श्वासच हरवला आहे, अशी एकाची बोलकी प्रतिक्रिया होती.

सध्या ही समाजमाध्यमे म्हणजे संवादक्रांतीचे दुसरे रूप समजले जाते. यामुळे माणसा-माणसांतील संवाद हरवला असला, ती एकमेकांपासून दूर असली तरी समाजमाध्यमातून जवळ असतात. सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगच्या संदेशाने त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि गुड नाईटने संपतो. या संदेशातही व्हरायटी असते. कुणी भावनिक आवाहन करतो, कुणी सुविचार सांगतो, कुणी आणखी काही... तरुण पिढी तर या माध्यमांच्या आहारी गेल्याचेच चित्र सार्वत्रिक दिसते. शेजारी शेजारीही बसून एकमेकांशी न बोलता सगळ्यांची डोकी मोबाईलमध्येच असतात.

याला कसली क्रांती म्हणायची? शारीरिक व्यायाम, पुस्तकांचे वाचन कमी झालेले दिसते. तंदुरुस्तीसाठी जीमला जायचे फॅड असले तरी नेहमीची कामे करायला त्यांचा कंटाळा दिसतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते याला काही अपवादही असतात. मात्र, बहुतांश चित्र असेच असल्याचे पालकांशी बोलताना जाणवते. सूचना किंवा माहितीची देवाण - घेवाण करण्यासाठी नोकरदार मंडळी, संस्था, संघटना व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलचा वापर करतात. मात्र, दोन दिवस इंटरनेट सेवाच बंद राहिल्याने त्यांचे नियोजनही कोलमडले. एखाद्याला भेटायला जायचे असले तरी संदेश न टाकता थेट बोलूनच जावे लागले. अशीच परिस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचीही झाली.

पण, या माध्यमांचा गैरवापर करणारेही कमी नाहीत. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, चारित्र्यहनन करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. सायबर सेल अशा लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करीत असतो. तरीही, ही प्रवृत्ती कमी होत नाही. परवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडून त्या अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. एखादा संदेश आपण कोणतीही खातरजमा न करता पुढे इतरांना पाठवित असतो. तो चुकीचा असेल तर समाजात चुकीची माहिती पसरते. भावनेला हात घालणारा, स्वाभिमान डिवचणारा संदेश असेल तर तो वाचून अनेकांची माथी भडकतात आणि ते हिंसाचाराला प्रवृत्त होतात. कोरेगाव भीमा प्रकरणातही खºया-खोट्याची सत्यता न पाहता असे संदेश फॉरवर्ड होत राहिल्याने तणाव वेगाने वाढला.

राज्यभर पसरला. इंटरनेट बंदीचा उपाय घटना घडल्या घडल्या लगेच केला असता तर हा तणाव इतका वेगाने वाढला नसता, असे म्हणायला वाव आहे. कारण कोल्हापुरात इंटरनेट बंदी लागताच संदेशांची देवाण-घेवाण थंडावली आणि परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्यास मदत झाली. एकूणच काय समाजमाध्यमे जितकी चांगली तितकीच वाईटही आहेत. त्यातले चांगले काय आणि वाईट काय, हे आपण निवडायचे आहे. समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाºयांना आवर घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना अशा लोकांची नावे कळवायला हवीत. अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई केली तरच या माध्यमांचा गैरवापर करणाºयांना चाप बसेल. केवळ फायदे कसे घ्यायचे एवढेच पाहिले जाईल, दुरुपयोग करण्यास कुणी धजावणार नाही. हा दिवस येईल तो सुदिन समजावा.(चंद्रकांत कित्तुरे लेखक लोकमतचे उपवृत्तसंपादक आहेत)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे