शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय चालक परवान्याचा टक्का वाढला

By admin | Updated: June 30, 2016 01:09 IST

परदेशात ड्रायव्हिंगचा मोह : वर्षभरात १९३ जणांनी काढले परवाने; २१ महिलांचाही समावेश

सचिन भोसले --कोल्हापूर --नोकरी, शिक्षण वा परदेशी पाल्यांकडे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परदेशातही गेल्यानंतर गाडी चालविण्याचा मोह काहींना होतो. अशावेळी ड्रायव्हिंग लायसेन्सची कमतरता भासते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय चालक परवाना काढणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरात १९३ जणांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये असे आंतरराष्ट्रीय परवाने काढले आहेत. परदेशात गेल्यानंतर तेथील चकाचक रस्ते पाहून काहीजणांना तेथे कार वा दुचाकी चालविण्याचा मोह आवरत नाही. यासाठी मग तेथील कायद्यानुसार चालक परवाना अत्यंन आवश्यक आहे. अशावेळी तेथील कायदे कडक असल्याने तेथे परवाना काढताना बाहेरील देशातील नागरिकांची दमछाक होते. असे परवाने आपल्या देशातील ज्या-त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मिळण्याची सोय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चालक परवाना काढण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. कोल्हापुरातही गेल्या वर्षभरात १९३ जणांनी असे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढून घेतले. त्यात १७२ पुरुष, तर २१ महिलांचा समावेश आहे. हे परवाने केवळ एक वर्षासाठीच दिले जातात. त्यानंतर पुन्हा या परवाने नूतनीकरण करावे लागतात. या परवान्याकरीता पासपोर्ट, व्हिसा, नियमित दुचाकी, चारचाकी ड्रायव्हिंग लायसेन्स आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे सन २०१३-१४ (७८), तर २०१४-१५ या वर्षी आंतरराष्ट्रीय चालकपरवाना काढण्याचे प्रमाण १४० इतके होते . परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने परवाना काढणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या काही वर्षांत परदेशात शिक्षण, नोकरी आणि आधीच नोकरीत असलेल्या पाल्यांकडे राहायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यापूर्वी पुणे, मुंबई येथून परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, अभियांत्रिकी, संगणक आदी उच्च शिक्षणामुळे अमेरिका, जर्मन, जपान, चीन, फ्रान्स, आदी देशात नोकरीला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तेथील कायद्यानुसार वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मग अशावेळी तेथे परवाना काढणे अशक्य होते. हीच सोय भारतातही त्या-त्या ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे आहे. त्यानुसारच कोल्हापुरातही १९३ जणांनी असे आंतरराष्ट्रीय चालक परवाना काढले आहेत. - राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी