शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

हुपरीत शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय परिषद

By admin | Updated: December 2, 2015 01:07 IST

शेंडुरे महाविद्यालयात आयोजन : चार देशांतील प्राध्यापक येणार

हुपरी : रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षानिमित्त शुक्रवार (दि. ४) व शनिवार (दि. ५) हे दोन दिवस ‘बिझनेस मॅनेजमेंट इन्फरमेशन सिस्टम अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस : ए निड फॉर २०२०’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये आॅस्ट्रेलिया, इराण, इराक, श्रीलंकेसह दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, आदी राज्यांतील ३५० संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील व परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही. एन. माने यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठ यांंच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच ग्रामीण भागात होणार आहे. यावेळी जागतिकीकरणाच्या संदर्भात बिझनेस मॅनेजमेंट इन्फॉरमेशन्स सिस्टम, सोशल सायन्स आणि भाषा व साहित्य या विषयावर शोध निबंध सादर केले जाणार आहेत. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ९ वाजता माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी डॉ. महेश जोशी (आर. एम. आय. टी. युनिव्हर्सिटी मेलबर्न, आॅस्ट्रेलिया) डॉ. जी. एस. बत्रा (पंजाब युनिव्हर्सिटी, पतियाला) व डॉ. के. व्यंकट (दिल्ली) उपस्थित राहणार आहेत. साधन व्यक्ती म्हणून डॉ. एस. एस. वेर्णेकर (अधिष्ठाता आय. एम. इ. डी., पुणे) डॉ. अविनाश पाटील (कोल्हापूर), कृष्णा गावडे (किर्लोस्कर गु्रप), आदी मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी होणाऱ्या समारोपाचे पाहुणे म्हणून प्रा. जे. एफ. पाटील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भालबा विभुते आहेत. पत्रकार परिषदेत प्रा. संदीप किर्दत, प्रा. संजय साठे, प्रा. विनोद अवघडे, आदी उपस्थित होते.