शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आंतर निवासी डॉक्टरास मारहाण; लिपिकावर गुन्हा

By admin | Updated: July 17, 2014 00:39 IST

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविल्याचा राग

कोल्हापूर : माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविल्याचा राग मनात धरून सीपीआरमधील लिपिकाने आंतर निवासी डॉक्टरास लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये जगन्नाथ मुकुंद नार्वेकर (वय २९, रा. विद्यार्थी वसतिगृह सीपीआर, मूळ गाव कणकवली) हे गंभीर जखमी झाले. सीपीआरच्या मुख्य इमारतीत आज, बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला. अखेर नार्वेकर यांनी संशयित लिपिक अजय गुजर यांच्याविरोधात सीपीआर पोलीस चौकीत फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, मुकुंद नार्वेकर हे प्रशिक्षणार्थी आंतर निवासी डॉक्टर म्हणून सीपीआरमध्ये काम करतात. त्यांच्या नावे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज आल्याने त्यांना गुजर यांनी बोलावून घेतले. ते गेले असता मी गुजर आहे, काय माहिती पाहिजे आहे तुला, अशी त्यांनी विचारणा केली. त्यांनी मी असा अर्ज केलेलाच नाही, मला अर्ज पाहू द्या, असे म्हणताच त्यांना गुजर यांनी रागाने त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या उजव्या गालावर जखम झाली. या प्रकाराने कार्यालयात गोंधळ उडाला. त्यानंतर नार्वेकर हे स्वत: अपघात विभागात उपचार करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी ही माहिती सीपीआर पोलीस चौकीत दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर उशिरा गुजर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)