शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’च्या विक्री व्यवहारास अंतरिम स्थगिती

By admin | Updated: May 20, 2015 00:10 IST

ऋण वसुली प्राधिकरणाचे आदेश : दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत निर्बंध

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारास दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगितीचा आदेश मंगळवारी ऋण वसुली प्राधिकरणाचे न्यायमूर्ती दीपक ठक्कर यांनी दिला. त्यामुळे जिल्हा बॅँक आणि गणपती जिल्हा संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने आ. अनिल बाबर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पुणे येथील ऋण वसुली प्राधिकरणामध्ये वस्तुस्थिती मांडण्यास याचिकाकर्त्यांना सांगितले. त्यासाठी सहा आठवड्यांची देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवली. प्राधिकरणाकडे यासंदर्भात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकेवरील अंतिम निकाल होईपर्यंत अंतरिम स्थगितीचा आदेश दिला. तोपर्यंत बॅँकेला कोणताही विक्री व्यवहार करता येणार नाही असेही म्हटले आहे. कारखान्याची लिलाव प्रक्रिया जिल्हा बॅँकेने चुकीच्या पद्धतीने राबविली आहे. अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. गायरान जमिनीचा मुद्दा अडचणीचामौजे नागेवाडी येथील गट नं. ५४१/१ व १२५८/१ ही जमीन गायरान असून, याचे क्षेत्र सुमारे १०३ एकर आहे. ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावेळी कारखान्यास मिळाली आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अशी जमीन विकता येणार नसल्याने हा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे.