शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या इच्छुक

By admin | Updated: November 11, 2015 23:52 IST

आजरा तालुका : स्थानिक प्रजातींचे बियाणे, खतांचे अस्तित्व धोक्यात

ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजराआजरा तालुक्यात असणारी पाण्याची मुबलकता, कसदार जमीन व सकारात्मक भौगोलिक वातावरण यामुळे तालुक्यात नवनवीन शेतीमधील उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने बाहेरच्या बड्या कंपन्या करार तत्त्वावर जमिनीचे मोठे तुकडे घेण्यास प्रयत्नशील असून, दर्जेदार बियाणे, सेंद्रीय शेतीस प्राधान्य व आवश्यकता भासल्यास दर्जेदार खतांचा वापर केला जाणार असल्याने स्थानिक प्रजाती व त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर होणाऱ्या स्थानिक खतांच्या अस्तित्वाबाबत येत्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.करार पद्धतीने दीर्घ कालावधीकरिता विविध पिकांच्या लागवडीसाठी बाहेरच्या कंपन्या आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी घेण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने हालचालीही सुरू आहेत. शंभर ते अगदी दहा हजार एकरपर्यंतच्या जमिनींचा शोध आजरा तालुक्यात सुरू आहे. यंत्रांच्या साहाय्याने अत्याधुनिक बियाण्यांचा व प्रगत जैविक, द्रवीय खतांचा वापर करून ही शेती केली जाणार आहे. एका मोठ्या कंपनीने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बटाटा व हरभरा लागवड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.आंतरराष्ट्रीय कंपन्यांना या सर्व प्रकारात यश आले तर स्थानिक पारंपरिक वाणांचे स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी शेतकरी वर्गास मोठे कष्ट करावे लागणार आहेत. काही शेतकऱ्यांनी थेट करार करून त्यांच्यामार्फत बी-बियाणे, खते पुरवून शेती करवून घेण्याचे पर्यायही शेतकऱ्यांसमोर पुढे येत आहेत.संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करून दर्जाशी तडजोड न करता बाजारात ज्याची मागणी आहे अशीच पिके पिकविण्याकडे यापुढे अशा कंपन्यांचा कल राहणार आहे. प्राधान्याने सेंद्रीय पद्धतीने पीक घेण्यात येणार असल्याने रासायनिक व इतर खत विक्रीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.एकंदर करार तत्त्वावर आंतरराष्ट्रीय कंपन्या आजरा तालुक्यात शेतीवर वर्चस्व निर्माण करण्यास प्रयत्नशील असून, यामुळे स्थानिक शेतीला धोक्याचा इशारा मिळू लागला आहे.ऊस उत्पादन घटणार?बागायत पिकांच्या जमिनीवर अशा कंपन्यांचा डोळा असून, विनासायास भक्कम रकमा जमीनमालकांना मिळणार असल्याने ऊस पिकामध्ये घट होणार आहे.