शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एकीकरण’चा बालेकिल्ला दुहीमुळे सर होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:55 IST

प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून ...

प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून नव्याने हा ग्रामीण मतदारसंघ बनला आहे. कट्टर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते या मतदारसंघात मोडतात. समिती, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पुन्हा एकदा या मतदारसंघात होणार आहे. मागील २०१३ च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि समितीत या तिन्ही पक्षात बंडखोरी झाली होती. यात भाजपचे संजय पाटील विजयी झाले होते.अशी असेल लढतया मतदारसंघात राज्य महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेसमधून, तर आमदार संजय पाटील हे भाजपमधून आणि एकीकरण समितीतून माजी आमदार मनोहर किणेकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांची एन्टी इंकम्पसी फॅक्टर म्हणून विद्यमान आमदार संजय पाटील यांनी मतदारसंघ बदल करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, तर एकीकरण समितीतूनदेखील किणेकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी होत आहे. तसे न झाल्यास मागील निवडणुकीप्रमाणेच लढत असेल.बंडखोरीची शक्यताया मतदारसंघात जसे मराठी माणसात एकमत न झाल्यास समितीच्या दोन्ही गटातील उमेदवार समोरासमोर उभे राहू शकतात, तर दुसरीकडे काँग्रेसमध्येदेखील माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक शिवनगौडा पाटील यांनी निधर्मी जनता दलात सामील होऊन आपली उमेदवारी नक्की केली आहे. भाजपमध्ये केजीपी-भाजप या निवडणुकीत एक झाले तरी जनसंपर्क कमी पडल्याने एन्टी इंकम्पसीमुळे विद्यमान भाजप आमदारांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही.मराठी अस्मिता आणि विकास हीच मुख्य कारणे या मतदारसंघात येतात. पश्चिम भाग ९० टक्के मराठी भाषिक मतदार आहे, तर पूर्व भागातील अर्धा भाग मराठी आहे, त्यामुळे मराठीचे प्राबल्य या मतदारसंघावर आहे. एकीकरण समितीत एकी झाल्यास एकास एक उमेदवार आल्यास या मतदारसंघात समितीला विजय मिळवणे सोपे जाईल, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच ग्रामीण मतदारसंघातील गावागावांतून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मुख्यत: समिती विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात दिसण्याची चिन्हे आहेत.