शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी इच्छुकांची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:13 IST

कोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक विश्वेश्वरय्या हॉल येथे होत आहे. भाजप-ताराराणी ...

कोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक विश्वेश्वरय्या हॉल येथे होत आहे. भाजप-ताराराणी आघाडीची बैठक उद्या, मंगळवारी होत आहे. महापौर पदावर चौघांनी दावा सांगितल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला असून, इच्छुकांची घालमेलही वाढली आहे.दरम्यान, ‘स्थायी’मधील अनुभव पाठीशी असल्याने आमदार हसन मुश्रीफ यांनी कामलीची सावध भूमिका घेतली आहे. सरिता मोरे व अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांना सहा-सहा महिन्यांची संधी देऊन तिढा सोडविता येईल; पण पहिल्यांदा कोणाची वर्णी लावायची हा पेच कायम राहणार आहे.कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार यंदा महापौरपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. या पदासाठी सरिता मोरे, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी, अनुराधा खेडकर इच्छुक आहेत. पाच वर्षांत राष्ट्रवादीला दोनच वेळेला महापौरपद, तर तीनवेळा स्थायी समिती सभापतिपद मिळणार आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, या ईर्ष्येने चारही इच्छुकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. लाटकर व मोरे हेच महापौर पदासाठी प्रबळ दावेदार असून, राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणात कोण बाजी मारणार हा उत्सुकतेचा विषय आहे. भाजप-ताराराणीकडून महापौर पदासाठी जयश्री जाधव, सविता भालकर व भाग्यश्री शेटके यांची नावे चर्चेत आहेत. उपमहापौर पद कॉँग्रेसकडे जाणार असून, यासाठी भूपाल शेटे, श्रावण फडतरे व अशोक जाधव यांनी ताकद लावली आहे.दरम्यान, महापौर व उपमहापौर पदांसाठी बुधवारी (दि. ५) अर्ज भरण्यात येणार असून, १० डिसेंबरला निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांची आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे मते आजमावून घेणार आहेत. त्यानंतर उद्या, मंगळवारी बैठक घेऊन बुधवारी (दि. ५) सकाळीच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे.‘स्थायी’साठी ‘हबकी’ डावराष्ट्रवादीकडे महापौरपद एक वर्षासाठी आणि इच्छुक पाच आहेत. त्यामुळे ज्याचे राजकीय वजन जास्त त्यांनाच संधी मिळणार, हे निश्चित आहे. फारच ताणाताणी झाली तर महापौरपद नसेना, वर्षानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याचे स्थायी समितीच्या सभापतिपदी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांमधील काहींनी नेत्यांवर ‘हबकी’ डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना मिळाली संधीहसिना फरास (महापौर), महेश सावंत (उपमहापौर), सुनील पाटील (उपमहापौर), मुरलीधर जाधव (स्थायी सभापती), शमा मुल्ला (उपमहापौर), वहिदा सौदागर (महिला, बालकल्याण), अजिंक्य चव्हाण (शिक्षण सभापती)उपमहापौरसाठी यांनी ताकद लावली पणालाफॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद कॉँग्रेसकडे जाणार असून, यासाठी भूपाल शेटे, श्रावण फडतरे व अशोक जाधव यांनी ताकद लावली आहे. उपमहापौरसाठी यांनी ताकद लावली पणालाफॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद कॉँग्रेसकडे जाणार असून, यासाठी भूपाल शेटे, श्रावण फडतरे व अशोक जाधव यांनी ताकद लावली आहे.