शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदकेसरीं’च्या मदतीसाठी अखंड झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:51 IST

कोल्हापूर : फुप्फुसांच्या गाठी व प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने त्रस्त असलेल्या हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी सलग पाचव्या दिवशीही मदतीचा झरा अखंड सुरूच आहे. मंगळवारी दिवसभर अनेकजणांनी भेट घेत सुमारे लाखाची मदत केली. मुख्यमंत्री सहायता निधीकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले.करवीरनगरीचा नावलौकिक साऱ्या देशभर करणाºया व कर्मभूमी म्हणून ...

कोल्हापूर : फुप्फुसांच्या गाठी व प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने त्रस्त असलेल्या हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी सलग पाचव्या दिवशीही मदतीचा झरा अखंड सुरूच आहे. मंगळवारी दिवसभर अनेकजणांनी भेट घेत सुमारे लाखाची मदत केली. मुख्यमंत्री सहायता निधीकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले.करवीरनगरीचा नावलौकिक साऱ्या देशभर करणाºया व कर्मभूमी म्हणून हिंदकेसरी किताब पटकावल्यानंतरही येथेच वास्तव्यास असणारे दीनानाथसिंह हे डाव्या फुप्फुसात रक्ताच्या दोन गाठी व प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीमुळे त्रस्त आहेत. प्रोस्टेट ग्रंथींवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मंगळवारीही वसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, गोल्ड माईन स्टॉक लिमिटेडचे प्रादेशिक प्रमुख किशोर धारे, संदीप यादव, जमीर मुल्लाणी, तानाजी शिंदे, संदीप पाटील, कमलेश तांदळे आणि मित्र परिवारातर्फे रोख एक लाख रुपयांची मदत दिली. ज्या क्रीडाप्रेमींना हिंदकेसरी दीनानाथसिंह यांना मदत करावयाची आहे, त्यांनी दीनानाथ अतरनारायण सिंह - स्टेट बँक आॅफ इंडिया खाते क्रमांक १०५५७५४८९५८ व आयएफएससी कोड - एसबीआयएन ००१५५५७ यावर करावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.नरके यांच्याकडून प्रकृतीची विचारपूसआमदार नरके यांनीही ‘हिंदकेसरीं’च्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मधून पाच लाखांची तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.