शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांनाच अपमानित करणे ही निंदनीय बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची ...

इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट 'आंदोलनजीवी' अशी हेटाळणी करून समस्त आंदोलनकर्त्यांनाच अपमानित केले जात आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीत आयोजित 'आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे' या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत आंदोलने, निदर्शने, मोर्चा असे मार्ग अवलंबणे गृहीत असते, पण सत्याला सामोरे जाण्याची, शंकांचे निरसन करण्याची कुवत वा धमक नसली की, अशी असंस्कृत भाषा येत असते. ती भ्याड मनोवृत्तीतून अथवा हुकूमशाही विकृतीतून येत असते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शेतकरी आंदोलनजीवी नसून पंतप्रधानच भांडवलदारजीवी असल्याची व ते आंदोलक आहेत जुमलेबाज नाहीत, अशी टीका करून शेतकऱ्यांची हेटाळणी केल्याबद्दल माफी मागावी अशी, तसेच २६ जानेवारीच्या प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. सरकारने एक-दोन बगलबच्च्या भांडवलदारांच्या ओसंडून वाहणाऱ्या तिजोऱ्या पुन्हा भरण्याऐवजी या देशातील अब्जावधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत. दमनाला अहिंसेने उत्तर देऊन यशस्वी होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, समतेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा हा देश आहे, असे चर्चासत्रात मत पुढे आले. प्रसाद कुलकर्णी यांच्या बीजभाषणानंतर झालेल्या चर्चासत्रात शशांक बावचकर, दयानंद लिपारे, तुकाराम अपराध, राजन मुठाणे, महालिंग कोळेकर, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, बापूसाहेब भोसले सहभागी झाले होते.