शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनाऐवजी मुत्राशय पिशवी काढली

By admin | Updated: July 27, 2016 01:04 IST

सेनापती कापशीतील प्रकार : आरोग्य अधिकाऱ्यांचा गलथानपणा

सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेकरिता दाखल झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया न करता थेट मुत्राशयाची पिशवीच कट केली. यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी, सेनापती कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवारी (दि. २५) व मंगळवारी (दि. २६) कुटुंब नियोजनाचा कॅम्प आयोजित केला होता. यामध्ये चिमगाव (ता. कागल) येथील राजश्री अभिजित करडे या कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सोमवारी दाखल झाल्या. मंगळवारी (दि. २६) सकाळी आरोग्य अधिकारी डॉ. बी. पी. सातपुते यांनी राजश्री यांना शस्त्रक्रियेकरिता आॅपरेशन थिएटरमध्ये घेतले. त्यावेळी डॉ. सातपुते यांनी कुटुंब नियोजनाचे आॅपरेशन न करता मुत्राशयाची पिशवीच कट केली. त्यानंतर त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना बोलावून आॅपरेशनमध्ये अडचणी आल्या असून, रुग्णाला ताबडतोब कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिकेतून सी.पी.आर.मध्ये राजश्री यांना दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी वरील संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईक हादरलेच. रुग्णाला जास्तच त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, राजश्री कुरडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात डॉ. सातपुते यांच्याविरोधात आॅपरेशन दरम्यान डॉ. सातपुते यांनी कानात म्युझिक कॉड लावून गाणी ऐकत शस्त्रक्रिया करीत असताना माझ्या मुत्राशयास मोठी दुखापत केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरांची उद्धट वर्तणूकराजश्री करडे यांचे बंधू सचिन चेचर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, डॉ. सातपुते हे आॅपरेशन दरम्यान गाणी लावून आॅपरेशन करीत होते. तसेच सातपुते यांनी आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. सी.पी.आर.मधील डॉक्टरनी आम्हाला माहिती दिल्यामुळे आम्ही योग्य उपचार करू शकलो. डॉ. सातपुतेंची उद्धट वर्तणूक असून, त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे, तसेच बुधवारी आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.आॅपरेशनमध्ये असे होऊ शकते : डॉ. सातपुतेआॅपरेशन दरम्यान असे होऊ शकते. मूत्राशयाची पिशवी ओपन झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी ताबडतोब प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेतून सी.पी.आर.मध्ये दाखल केले. प्रत्यक्ष रुग्णांची भेटही घेतली आहे.