शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लोंघेत मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

By admin | Updated: September 21, 2015 00:06 IST

मूर्तींना कोणतेही रंगकाम वर्ज्य : लोंघेचा आदर्श अन्य गावांनी घेतल्यास प्रदूषण थांबण्यास मदत

प्रकाश पाटील -- कोपार्डे  कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कोल्हापूरच्या पश्चिमेला अवघ्या १७ कि.मी.वर असलेल्या लोंघे गावात नैसर्गिक मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याची प्रथा आहे. येथील ग्रामस्थ घरगुती गणपती, तर तरुण मंडळे सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केवळ मातीपासून बनविलेल्या मूर्तीचीच करतात.लोेंघे हे गाव निसर्गरम्य अशा गगनबावडा तालुक्यात आहे. गावची लोकसंख्या जेमतेम तीन ते साडेतीन हजार आहे. येथे सर्व क्षेत्रांत दिसणाऱ्या थाटामाटाचे दर्शन दिसते. अपवाद आहे तो गणपतीच्या मूर्तींचा. गावात दोन तरुण मंडळे आहेत, तर घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. सध्या सर्वत्र रंगीत शाडूचे, चिकनमाती, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या आकर्षक मूर्तींकडे सर्वांचा मोठा कल आहे. लोंघे गावात मात्र आजही नैसर्गिक चिखल मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींचीच प्रतिष्ठापना केली जाते. एवढेच नाही, तर या मूर्तींना कोणतेही रंगकाम वर्ज्य आहे. जशी माती, तशीच कोरीव व आकर्षक मूर्ती. मूर्तींच्या आकारातही भव्यदिव्यपणा नाही. गणेश मंडळे सर्वसाधारण चार ते पाच फू ट उंचीची शुद्ध नैसर्गिक मातीपासून बनविलेल्या मूर्र्तीचीच प्रतिष्ठापना करतात. या मूर्तींनाही कोणताही रंग लावत नाहीत. अशाच प्रकारे घरगुती गणपतींच्या मूर्ती बसविल्या जातात. त्यांचाही आकार दीड ते दोन फुटांच्यावर नसतो. मात्र, गणपतीच्या सभोवती आकर्षक सजावट करून मकर बनविण्यात हे गाव मागे नाही.गावात घरगुती गणपतीव्यतिरिक्त दोन ते तीन फूट उंचीच्या गणेशमूर्तींची स्थापना केली जाते; पण कोणताही रंग अथवा शाडूचा वापर होत नाही. याचे नेमके कारण सांगता येत नसले, तरी देवाचा कोप होऊ नये ही भावना त्या पाठीमागे आहे.- ज्ञानदेव मोळे, ग्रामस्थगावातील ग्रामदेवतेला नैसर्गिक मातीच्याच गणेशमूर्ती मान्य असल्याचे बोलले जाते. पूर्वजांपासून ही प्रथा सुरू आहे.- अजित पाटील, ग्रामस्थ लोंघे