शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

टाकाऊ प्लायवूडचे अप्रतिम कोलाज

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

जयंत हुबळी यांच्या कलाकृती : जहागीर आर्टनंतर थेट कोल्हापुरात प्रदर्शन

कोल्हापूर : लाकडापासून विविध कलाकृती किंवा वस्तू बनवणे हा हस्तकलेचाच एक प्रकार; पण टाकाऊ प्लायवूडपासून सुंदर चित्र बनवण्याची अनोखी कला म्हैसूरचे जयंत हुबळी यांनी साधली आहे. वेस्ट वुड विनिअर आर्टचे प्रणेते असलेल्या हुबळी यांनी एखाद्या कॅन्व्हासवर किंवा प्लायवूडवर चित्रे रेखाटल्याप्रमाणे वाटावीत, अशा सफाईदारपणे घडवलेल्या या अप्रतिम चित्रकृतींचे प्रदर्शन गुरुवार (दि. १)पासून आयोजित करण्यात आले आहे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या कलेबद्दलची माहिती दिली. यावेळी युनिव्हर्सल सर्व्हिसेसचे आनंद कुलकर्णी उपस्थित होते. ते म्हणाले, शाहू स्मारक भवनच्या कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता ज्येष्ठ चित्रकार जे. बी. सुतार यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीनंतर कोल्हापुरात हे प्रदर्शन होत आहे. बेळगावमध्ये जन्मलेल्या आणि आता म्हैसूरमध्ये स्थायिक असलेल्या जयंत हुबळी यांनी गेल्या २० वर्षांत एक हजार चित्रकृती निर्माण केल्या आहेत. त्यापैकी ८०० चित्रकृतींची विक्री झाली आहे. या अनोख्या कलाकारीबद्दल त्यांना कर्नाटक राज्य शासनाचा कर्नाटक ललित कला अकादमी पुरस्कार, तसेच म्हैसूर दसरा अवॉर्ड २०१४, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापुरात होत असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी घडवलेल्या ३० चित्रकृती मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत खुले राहील. तरी रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वेस्ट वुड विनिअर आर्टअनेकजण कलेच्या अभिव्यक्तीसाठी कोळसा, पेन्सिल, ब्रश अशी साधने वापरतात. जयंत हुबळी यांनी उपयोगात येऊ न शकणाऱ्या प्लायवूडमधील नैसर्गिक सौंदर्य शोधून ते अधिक खुलविण्यासाठी ‘वेस्ट वुड विनिअर आर्ट’ ही शैली आत्मसात केली. प्लायवूड आणि लाकडापासून ही चित्रे निर्माण करताना त्याला रंगविणे, पॉलिश करणे किंवा टचअप करणे, अशा कृत्रिम साधनांचा वापर केलेला नाही.