शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन आजपासून

By admin | Updated: September 28, 2016 00:43 IST

तीन जिल्ह्यांतील शाळांचा सहभाग : व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे ‘जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड २०१६’ या प्रदर्शनाला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र हायस्कूल येथे मंगळवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी शिंदे म्हणाल्या, ‘कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्णांतील २६१ शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. शुक्रवार (दि. ३०)पर्यंत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भरणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, बुधवारी महापौर अश्विनी रामाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील असतील. या प्रदर्शन कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयावर व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.’या प्रदर्शनातील इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी अशा दोन गटांतील उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर-२०८, सांगली-३३, सिंधुदुर्ग-२० अशा एकूण २६१ शाळा आपल्या उपकरणांची मांडणी करणार आहेत. प्रदर्शन परिसरास ‘श्री राजर्षी शाहू विज्ञान नगरी’ असे नाव देण्यात आले असून, सभा मंडपास ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ यांचे नाव देण्यात आले आहे. या विज्ञान स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी १२.३० वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील असतील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, डायटचे प्राचार्य डॉ. विलास पाटील प्रमुख उपस्थित असतील.प्रदर्शनातील कार्यक्रम :४बुधवारी (दि. २८) दुपारी १२.३० वा. : उद्घाटन दुपारी २.३० वा. : प्रदर्शन पाहण्यासाठी खुले सायंकाळी ६ वा. : बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रम४गुरुवारी (दि. २९) : सकाळी १० वा. : प्रदर्शन पाहणी/ परीक्षणसायंकाळी ६ वा. : बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रम४शुक्रवारी (दि. ३०) सकाळी १० वा. : प्रदर्शन पाहणी/ परीक्षणदुपारी १२.३० वा. : पारितोषिक वितरण व समारोप समारंभ.