शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी

By admin | Updated: June 9, 2016 01:20 IST

‘कन्यागत’ची तयारी : नृसिंहवाडी येथे घेतला आढावा

नृसिंहवाडी : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आॅगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळासाठी १२१ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ यातील पहिल्या टप्प्यातील ६५ कोटींच्या विविध विकासकामांची बुधवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ़ सैनी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रस्त्याचे डांबरीकरण, विठ्ठल मंदिर, यात्री निवास, शुक्लतीर्थ घाट, पापविनाशिनी घाट, नृसिंहवाडी बस स्थानक, मंदिर प्रवेशावरील काँक्रीट रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र हॉल, तात्पुरती पार्किंग व्यवस्था या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांकडून कामाची माहिती घेतली़ काही ठिकाणी स्वत: जागेची मापे टाकून खात्री करून घेतली़, तर पापविनाशिनी घाटाजवळ गावचे सांडपाणी नदीत मिसळणे, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्याचे नियोजन करण्याबाबत कडक सूचना दिल्या़ माहेश्वरी परिसरातील रस्त्याबाबत संबंधित ठेकेदाराची चांगलीच कानउघडणी केली़ या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार बुरूड, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सचिन गिरी, कुरुंदवाडचे सपोनि कुमार कदम, शिरोळचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम उपस्थित होते़कन्यागतसाठी शासनाने जो निधी दिला आहे, तो या भागाचा विकास व्हावा, तसेच येथे पर्यटन वाढावे, येथे येणाऱ्या यात्रेकरूंना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिला आहे़ त्यामुळे ही कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी संबंधित ठेकेदार कामे व्यवस्थित करतात की नाही, कामाचा दर्जा याबाबत शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत यांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी सैनी यांनी येथे होणाऱ्या कामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही़, अशा संबंधितांना सूचना दिल्या़कन्यागत कामाबाबत व नियोजनाबाबत उपसरपंच धनाजीराव जगदाळे, राहुल पुजारी, संजय पुजारी, शशिकांत पुजारी, राजेश खोंबारे, सोमनाथ पुजारी, कृष्णा गवंडी, गुरुदास खोचरे, ठेकेदार दीपक कबाडे, रवी गायकवाड, गुरुप्रसाद रिसबूड यांनी माहिती दिली़ यावेळी मंडल अधिकारी ए़ डी़ पुजारी, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी अतुल पाटील, अश्विन डुणुंग, अभिजित जगदाळे, आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)अधिकारी धारेवर : कामाबाबत सूचनाजिल्हाधिकारी अमित सैनी यांनी कन्यागतसाठी मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण व्हावीत याबाबत या कामाचे ठेकेदार, विविध विभागांचे शासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. पुढील कामांच्या सुधारणांबाबत त्यांनी यावेळी सूचना दिल्या़