यावेळी आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दुर्घटनेनंतर त्या जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिट(एसएनसीयू)ची पाहणी केल्यावर आगीचे स्वरूप भीषण असल्याचे जाणवत असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. त्यामुळे अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांना खबरदारीच्या उपायांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. ही घटना फारच गंभीर असून यात झालेली जीवितहानी मोठी आहे. सरकार कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांची वीजयंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणेची तात्काळ तपासणी करून सुधारणा करण्याच्या सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या.
फोटो - १००१२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - भंडारा जिल्हा रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.