शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

‘व्यंकटेश्वरा, रेणुका, उगार’कडून चौकशी

By admin | Updated: April 21, 2017 23:10 IST

वसंतदादा कारखाना निविदा प्रक्रिया : शुक्रवारी दिवसभरात अर्जाची विक्री नाही

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने देण्यासाठी निविदा अर्ज विक्री व दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दिवसभरात व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर व उगार शुगर या तीन कारखान्यांनी जिल्हा बँकेकडे चौकशी केली. निविदा दाखल करण्याची मुदत ३ मेपर्यंत आहे. थकीत ९३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी सांगली जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला आहे. याच कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचा भाडेकरार किती वर्षांसाठी असावा, याचा निर्णय निविदाधारकांवर सोपविला आहे. कमीत-कमी कालावधित जास्तीत-जास्त भाडे देणाऱ्या संस्थेला प्राधान्याने कारखाना देण्याचे धोरण यामागे असण्याची चिन्हे आहेत. प्राप्त निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार बँकेने स्वत:कडे राखून ठेवला आहे. वसंतदादा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७ हजार ५०० टन आहे. कारखान्यासह डिस्टिलरी, यंत्रसामग्री, वापरातील इमारती, गोदामे व अन्य मालमत्ताही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया ८ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मे महिन्यात हा कारखाना नव्या संस्थेकडे जाणार आहे.निविदा अर्जांच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कारखाने इच्छुक आहेत. शुक्रवारी दिवसभरात व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर व उगार शुगर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने जिल्हा बँकेशी संपर्क साधून माहिती घेतली. या तीन कारखान्यांसह राजारामबापू व अथणी शुगर या दोन कारखान्यांच्या निर्णयाकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) पारदर्शी प्रक्रिया : दिलीप पाटीलवसंतदादा कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेतला असला तरी, शेतकरी, कामगारांसह इतर बँकांच्या देण्यांबाबत आमची नैतिक जबाबदारी आहे. जो कोणी हा कारखाना घेईल, त्याला कारखान्याच्या देण्यांबाबत सर्व ती माहिती दिली जाईल. या निविदेत कोणतीही कायदेशीर चूक राहू नये, याची खबरदारी घेत आहोत. त्यासाठी कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत होत आहे. सक्षम कारखान्यासोबत आम्ही चर्चेलाही तयार आहोत. त्यासाठी प्रसंगी निविदेला मुदतवाढ देण्याचीही आमची तयारी आहे. निविदाधारकाला पुरेसा वेळ मिळावा आणि कारखाना पुन्हा सुरू व्हावा, हाच बँकेचा हेतू असल्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.