शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संदेशातील आरोपाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’ अशा पाठवलेल्या खळबळजनक संदेशातील ...

कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’ अशा पाठवलेल्या खळबळजनक संदेशातील आरोपांची सखोल चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पो. नि. काळे यांची प्रकृती सुधारली असून त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून स्पेशल रूममध्ये स्थलांतरित केले आहे.

कामातील कसुरी अहवाल आणि पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठांनी शिफारस केली नसल्याच्या नैराश्येतून विमानतळ सुरक्षेत असलेले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी बुधवारी पहाटे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याचा खळबळजनक संदेश पाठवला होता. त्या संदेशामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचाही उल्लेख केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने यंत्रणा सक्रिय केली. मोबाइल लोकेशनद्वारे पो.नि. काळे हे पोलिसांना वारणा नदीच्या पुलानजीक नशेत बेशुद्धावस्थेत मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना गुरुवारी अतिदक्षता विभागातून बाहेर स्पेशल रूममध्ये स्थलांतरित केले आहे.

दरम्यान, पो. नि. काळे यांनी नशेत पाठवलल्या संदेशातील आरोपांची सखोलपणे चौकशी सुरू केली आहे, त्याबाबत लवकरच अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.