शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीची चौकशी करा

By admin | Updated: April 10, 2016 00:59 IST

ँप्राथमिक शिक्षक बँक : शिक्षक संघाची उपनिबंधकांकडे मागणी

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये बेकायदेशीर नोकरभरती केली असून, त्याच्यासह संपूर्ण कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. प्राथमिक शिक्षक बँकेत संचालकांनी नातेवाइकांची भरती केली आहे. ही भरती बेकायदेशीर असून निबंधक कार्यालय व युनियनची परवानगी न घेता ही भरती केली आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार सध्या बँकेत नोकरभरतीची गरज नव्हती. बॅँकेने यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून कोअर बॅँकिंग केले. पुरेसे नोकर असताना जाणीवपूर्वक शिपायांना सक्तीच्या रजेवर पाठवून ही नोकरभरती केली आहे. ज्येष्ठता डावलून मनमानी पदोन्नती देऊन शिपाई व लिपिक भरती केलेली आहे. बॅँकेच्या सभासदांना गेले अनेक वर्षे लाभांश नसताना संचालकांच्या भल्यासाठी भरतीची गरज काय? असा सवाल जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी केला. बेकायदेशीर व पोटनियमातील तरतूद डावलून तज्ज्ञ संचालकांची नेमणूक केलेली आहे. सर्वसाधारण सभेला सभासद वर्गणी एक हजार करण्याचा विषय होता, पण विषय चर्चेला येण्यापूर्वीच गोंधळात नामंजूर झाला. तरीही सातशे रुपये जबरदस्तीने सभासदांकडून वर्गणी वसुली सुरू आहे. काही सभासदांना राजकीय द्वेषातून कर्ज प्रकरणे नामंजूर केले जाते. एकीकडे १ टक्का व्याज वाढवून दुसरीकडे सभासदांचे व्याज गिळंकृत करून बॅँक निवडणुकीत खोटा ताळेबंद सादर केला. खोटा ताळेबंद सादर करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.