शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी

By admin | Updated: May 22, 2015 00:14 IST

‘लाचलुचपत’कडे तक्रार करा : शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेतील घरफाळा विभागात झालेल्या घोटाळ्यात केवळ शिपाई, लेखनिकांची चौकशी न करता त्या विभागाचे अधिकारी, उपायुक्तांचीही चौकशी करावी. त्याबरोबर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत खात्याकडे तक्रार करावी, अशी मागणी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. घरफाळा विभागातील एका कर्मचाऱ्यावर फौजदारी करण्याचे आदेश मागच्या आयुक्तांनी देऊनही हे आदेश कोणी दाबून ठेवले आहेत, असाही जाब यावेळी विचारला. गुरुवारी सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त शिवशंकर यांची भेट घेतली. महानगरपालिकेतील घोटाळ्याला सर्वस्वी संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारी व प्रशासनातील कारभारी जबाबदार आहेत. गलेलठ्ठ पगार असूनसुद्धा ज्या संस्थेत काम करतो, ती संस्थाच लुटून संपवायची, हे एकमेव धोरण अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न होण्यामागे काही पदाधिकाऱ्यांचे त्यांच्यासोबत असणारे लागेबांधे हेच प्रमुख कारण आहे, असे पवार यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. माजी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी घोटाळ्यास जबाबदार कर्मचाऱ्यावर फौजदारीचे आदेश दिले, परंतु बिदरी यांच्या बदलीनंतर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आदेश बासनात गुंडाळले. अशा अधिकाऱ्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदनही आयुक्तांना दिले. घरफाळा सवलत योजना रहिवासी मिळकतीसाठी असताना व्यापारी मिळकतींनासुद्धा दिली अशा व्यापारी मिळकतधारकांची यादी प्रसिद्ध करावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी, एचसीएल कंपनीच्या चुकीमुळे थकबाकी रक्कम कमी झाली, त्यामुळे सदर कंपनीचीही चौकशी करावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळात रवी चौगुले, दिलीप पाटील-कावणेकर, हर्षल सुर्वे, नगरसेवक राजू हुंबे, संभाजी जाधव, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, दिलीप जाधव, संजय जाधव, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, रणजित आयरेकर, कमलाकर जगदाळे, शुभांगी साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)