शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

केडीसीसीतील लाखावर खात्यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 01:15 IST

नाबार्ड पथकाची कारवाई; नोटाबंदी काळात ५० हजारांवर रक्कम भरलेली खाती

कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा झालेल्या १ लाख ३ हजार खात्यांची ‘नाबार्ड’च्या पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे. प्रत्येक खात्यांची ‘केवायसी’ पूर्ततेची चौकशी केली जाणार असून गेले दोन दिवस मुख्य कार्यालयात पथक ठिय्या मारून आहे. मंगळवारी त्यांनी करवीर, कागल, राधानगरी तालुक्यातील शाखांची मुख्य कार्यालयात बसून चौकशी केली. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या नोटा जिल्हा बँकेने सुरुवातीच्या काळात स्वीकारल्या, पण १३ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. या कालावधीत २७० कोटी रुपये जमा झाले होते. करन्सी चेस्ट बँकांनी ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने रिझर्व्ह बँकेने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून चौकशी केली. ज्या खात्यांवर दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली अशा अकरा शाखांची तपासणी केली. बँकेने प्रत्येक खात्यांची केवायसी पूर्ततेबाबतची माहिती ‘नाबार्ड’ला सादर केली. तोपर्यंत जिल्हा बँकेने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने ही रक्कम स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले. आदेश देऊन तीन आठवड्यांचा कालावधी झाला तरी ही रक्कम अद्याप बँकेतच पडून आहे. या रकमेवरील लाखो रुपये व्याजाचा भुर्दंड बॅँकेला सहन करावा लागत आहे. या रकमेची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँकेने ‘नाबार्ड’ला दिले. त्यानुसार सोमवारपासून ही तपासणी सुरू झाली असून ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा झालेल्या सर्व खात्यांची केवायसी पूर्तता पाहिली जाणार आहे. आज, बुधवारपर्यंत मुख्य कार्यालयात तपासणी करून त्यानंतर शाखांच्या पातळीवर तपासणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)शाहूवाडी, पन्हाळ्यातील शाखांची आज चौकशी!आज, बुधवारी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शाखांची जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातच तपासणी केली. गुरुवारी भुदरगड व शिरोळ तालुक्यांत जाऊन शाखांची तपासणी करणार आहे. शुक्रवारी उर्वरित तालुक्यांत जाऊन तपासणी करून रिझर्व्ह बँकेला अहवाल देणार आहे.