शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

‘आतला आवाज ’

By admin | Updated: January 9, 2017 00:53 IST

‘आतला आवाज ’

डिसेंबरचा महिना सुरू झाला की, प्रत्येकाच्या मनाला नवीन वर्षाचे वेध लागतात. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तसेच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. पण, खरंच काय दिलं या २0१६ वर्षानं आपल्याला? महागाई, बलात्कार, जातीय दंगली, शेतकरी आत्महत्या हे सामाजिक प्रश्न कालही होते, आजही आहेत, आणि उद्याही कदाचित ते तसेच असतील. ‘असं का? ही परिस्थिती कधीच बदलणार नाही?’ मी स्वत:लाच विचारलं. आणि मी विचारात असतानाच कुणीतरी माझ्या कानात कुजबुजलं ‘एक्सक्यूज’मी.’ मी वळून बघितलं तर माझ्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. घरात मी एकटीच होते. कोण बोललं मग? मी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो आवाज माझाच आतून येत असल्याचा भास आला. अगदी खोल मनाच्या अंतरंगातून... तो मला म्हणाला, ‘आताच तू म्हणालीस की, या सरत्या वर्षानं मला काय दिलं? पण, मी तुला विचारतो की, तू तरी काय दिलंस बरं या वर्षाला?’ मी थोडी गोंधळलेच. खरंतर निरुत्तरच झाले. पण, ‘आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय,’ मी म्हणाले. ‘ठीक आहे. ऐक मग. महागाई, बलात्कार, जातीय दंगली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारखी कोणतीही समस्या असो, ती सोडविण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे, तितकीच तुझ्यासारख्या सामान्य नागरिकाचीही आहे.’ म्हणजे? माझा काय संबंध या सगळ्याशी? मी म्हणाले. ‘अगं, असं कसं म्हणतेस, हा विचारच या समस्या निवारण करण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर स्वच्छता अभियानाचंच घे. आज अनेक शहरांत अनेक गट तसेच मंडळं यासाठी कार्यरत आहेत. पण, तरीही अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे तसंच आहे. स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असलेले आणि याविषयी संपूर्ण उदासीन असलेले याचं प्रमाण आजही खूपच व्यस्त आहे.’ ते ऐकल्यावर मलाही आठवलं, माझ्या घरातल्या कचऱ्याचं खत करण्याचा प्रकल्प मी सुरू केला. पण, बाहेरगेल्यावर नकळतपणे मीही या कचऱ्यात भर घालत होते. पुण्यालाजाताना वाटेत घेतलेल्या बटाटेवड्याचा कागद गाडीची काच खाली करून मी रस्त्याच्या कडेला टाकला होता. तिथं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्यात मी एक कागद टाकला तर बिघडलं कुठं? ‘अगं हाच विचार प्रत्येकजण करतं आणि ही समस्या सुटतच नाही. इतर समस्यांचंही तसंच आहे. पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावणं जितकं जरुरीचं आहे तितकंच जुन्या झाडांचं रक्षण करणं,’ तो आवाज म्हणाला. परवाच आमच्या गल्लीतली जुनी झाडं कापल्यावर भकास झालेलं वातावरण मला आठवलं. कुणीतरी पुढं होऊन त्यांना जाब विचारावा असं वाटलं होतं. ‘पण मग तूच का पुढं झाली नाहीस?’ त्या आवाजानं मला विचारलं. ‘अगं, बलात्काराची घटना असो किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवतो त्यांच्या मनाचा विचार कितीजण करतात? त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात?’ तो आवाज मला जाब विचारत होता. आता मलाही जाणवलं ‘खरंच, या घटना आपण थांबवू शकत नाही. पण, त्या प्रसंगात त्या व्यक्तीला, कुटुंबाला मानसिक तसेच आर्थिक आधार नक्कीच देऊ शकतो. त्या विचारानंही मला खूप बरं वाटलं. त्याचवेळी ही जाणीव याआधी कधीच कशी झाली नाही?’ असा प्रश्न पडला.‘खरं आहे तुझं. पण, याआधी असा निवांत वेळ, अशी शांतता तरी गेल्या कित्येक दिवसांत तू अनुभवली होतीस का? इतरांशी राहू दे. पण, स्वत:शी तरी संवाद साधला होतास का तू? आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळच असतात. पण, त्यासाठी एखाद्या दिवशी थोडा वेळ स्वत:ला द्यायला हवा. स्वत:शी थोडा संवाद, आत्मपरीक्षण करायला हवं. मनावरची जळमटं व साठलेली माती दूर करून आपलाच खोल हरवलेला आवाज ऐकायला हवा... माणुसकीचा झरा आटण्यापूर्वी शोधायला हवा... स्वच्छता अभियान आधी मनामनात जागवायला हवं... मग येणाऱ्या वर्षात अनेक गोष्टी नव्या असतील...काही नव्यानं गवसतील... नक्की. अगदी नक्की.’ तो आवाज मला आश्वत करीत होता आणि मी माझ्या विचारात हरवले होते.- उज्ज्वला करमळकर