शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

इंचनाळला महालक्ष्मी यात्रेचा वाद

By admin | Updated: February 13, 2016 00:31 IST

तारखेबाबत मतभेद : गावसभेत तोडगा न निघाल्याने चाकरमान्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे मागितली दाद

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई-पुणेस्थित ग्रामस्थ यांच्यात मतभेद आहेत. यासंदर्भात गावसभेतही तोडगा न निघाल्यामुळे मुंबईकरांनी समांतर सभा घेतली. दोन्ही बाजंूची मंडळी आपापल्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळे यात्रेबाबत पेच निर्माण झाला आहे. शेवटी चाकरमान्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.श्री गणेश जयंतीनिमित्त ग्रामदैवत गणपती देवाच्या महाप्रसादासाठी चाकरमानी मंडळी गावी आली आहेत. गुरुवारी सायंकाळी मुंबईकरांची बैठक झाली. त्यात विद्यार्थी व नोकरदार मंडळींच्या सोयीसाठी यात्रा मेमध्ये करावी, अशी सूचना आली. त्यानुसार स्थानिक प्रमुख मंडळींकडे मुंबईकरांची कैफियत मांडण्यात आली. त्यामुळे यात्रेसाठी दवंडी देऊन ग्रामसभा बोलविण्यात आली. शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या आवारात सभा झाली.२६ जानेवारी २०१६ च्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे २९ व ३० मार्चलाच यात्रा होईल, त्यात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पुढील पाच वर्षांनी होणारी यात्रा मेच्या सुटीत करण्यात येईल, असे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यास मुंबई-पुणेकरांनी जोरदार हरकत घेतली आणि समांतर सभा घेऊन १० व ११ मे रोजी यात्रा करण्याचा निर्णय जाहीर केला.यावेळी माजी सरपंच आनंदराव पोवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमृत पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष सयाजी देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पोवार, आदींसह हक्कदार व मानकरी उपस्थित होते.समांतर सभेत मुंबईकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील, तानाजी पाटील व फत्तेसिंह पाटील यांनी चाकरमान्यांची भावना व भूमिका स्पष्ट केली. यावेळी बापूसाहेब नांदवडे, संभाजी पाटील, संभाजी आजगेकर, धनाजी पाटील, विलास कुंभार, अशोक पाटील, मनोहर जाधव, दिलीप पाटील, मानसिंग पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.सामोपचाराने सर्वांच्या सोयीच्या तारखा निश्चित करण्याऐवजी दोन्ही बाजंूची मंडळी आपापल्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळेच यात्रेचा वादही प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे. कौलगे पाठोपाठ इंचनाळच्या लक्ष्मी यात्रेबाबतही वाद निर्माण झाला आहे. आर्थिक वर्षाअखेरमुळे रजा नाहीपुणे-मुंबईकर म्हणतात, मार्च महिन्यात आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे नोकरदार मंडळींना रजा-सुटी मिळत नाही. त्याशिवाय शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील याच महिन्यात आहेत. त्यामुळे सर्वांना आनंद लुटता यावा, यासाठीच मे मध्ये यात्रा करण्यात यावी.तिथीनुसार यात्रास्थानिक पुढारी म्हणतात, प्रथेप्रमाणे तिथीनुसार मार्चमध्येच यात्रा होईल. यापूर्वीच्या ग्रामसभेतही तसाच निर्णय झाला आहे. त्यामुळे यात्रेच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही.