शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजवर शासनाकडून ‘अन्याय’!

By admin | Updated: April 4, 2016 01:01 IST

निधीसाठी कोंडी : नागरी सुविधांसाठी मिळेना साथ; नागरिकांची भावना

राम मगदूम ल्ल गडहिंग्लज गोवा व कोकणचे प्रवेशद्वार आणि जिल्ह्याची दक्षिण राजधानी मानल्या जाणाऱ्या गडहिंग्लजनगरीतील नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करताना राज्याकडूनच वेळोवेळी कोंडी झाली. मात्र, मदतीची अपेक्षा असतानाच नाट्यगृहासाठी दिलेला पाच कोटींचा निधी सरकारने परत घेतला आहे. त्यामुळे गडहिंग्लजनगरीवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. कोल्हापूरपासून दक्षिणेस ७० किलोमीटरवर गडहिंग्लज आहे. सुमारे १०० ते १५० किलोमीटर परिघातील या तीनही तालुक्यांचे केंद्र म्हणून १९६० च्या दशकात गडहिंग्लजमध्ये प्रांत कचेरी सुरू झाली. त्यासाठी भाड्याने दिलेल्या नगरपालिकेच्या धर्मशाळेची इमारतही शासनाने वर्षापूर्वीच प्रांत कचेरीच्या नावावर करून पालिकेवर अन्याय केला. पाठोपाठ नाट्यगृहाचा दिलेला निधी परत घेऊन सरकारने पुन्हा शहरवासीयांवर अन्याय केला. गेल्या ५० वर्षांत सीमाभागातील महत्त्वाचे वैद्यकीय व शैक्षणिक केंद्र म्हणून ही नगरी विकसित झाली. लोकवस्ती ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. उत्पन्नाच्या मर्यादेमुळे येथील ‘क’ वर्ग नगरपालिकेवर सुविधांचा ताण आहे. अपेक्षित विकासासाठी पाठपुरावा झाला. मात्र, पालिकेतील सत्ताधारी व सरकार यांचा सूर जमलाच नाही. ४जिल्ह्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ आणि दुर्गम तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी सर्व उपविभागीय कार्यालये गडहिंग्लजमध्येच सुरू केली आहेत. त्यामुळेही नागरी सुविधांचा ताण वाढला. ४ प्रांत कचेरीबरोबरच जिल्हा व सत्र न्यायालय, पोलिस, पाटबंधारे, कृषी, दूरसंचार, या खात्यांची उपविभागीय कार्यालये येथे आहेत. ४दोनवेळचा अपवाद वगळता तीन दशके गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता आघाडीचीच सत्ता आहे. तरीही माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासह बहुतेक मुख्यमंत्र्यांनी मतभेद बाजूला ठेवून गडहिंग्लजला मदत केली. ४गतवेळच्या निवडणुकीत १०० कोटींचा निधी आणण्याचे आश्वासन देऊन राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता हस्तगत केली. मात्र, युतीचे सरकार आल्यामुळे फारसा निधी मिळाला नाही. ४सहा महिन्यांपूर्वी जनता दलाने राष्ट्रवादीकडून पुन्हा येथील सत्ता ताब्यात घेतली. नंतर मुश्रीफ यांचे विरोधक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनता दलाला जवळ केले. त्यांच्यासाठीच विधान परिषदेत महादेवराव महाडिक यांना जनता दलाने मदत केली. ४मात्र, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत ‘दादा’ आणि ‘जनता दला’चे बिनसले. यामुळेच नाट्यगृहाचा पाच कोटींचा निधी परत घेतल्याची चर्चा आहे. गडहिंग्लज नगरपालिकेचा पाच कोटी रुपयांचा निधी इतर नगरपालिकेकडे वळविण्यात कोणतेही राजकारण नाही. कारण चार-पाच महिन्यांपूर्वी गडहिंग्लज नगरपालिकेला निधी देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा याच नगरपालिकेला निधी देण्यापेक्षा ज्यांना निधी मिळालेला नाही, अशा इचलकरंजी, पन्हाळा, मलकापूर, कुरुंदवाड व मुरगूड या पाच नगरपालिकांकडे निधी वळविण्यात आला आहे. तसेच नगरविकास खात्यानेच हा निर्णय घेतला असल्याने यामध्ये कोणतेही राजकारण नसून हा प्रशासकीय भाग आहे. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री