शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तसाठ्याची माहिती आता फलकावर

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

सीपीआरमध्ये बैठक : कोल्हापूर जनशक्ती आंदोलनाचे फलित

कोल्हापूर : रोजच्या-रोज खासगी रक्तपेढ्यांसह येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)विविध रक्तगटांची माहिती फलकावर लावण्याचा निर्णय मंगळवारी सीपीआर प्रशासन व रक्तपेढी यांच्या प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांच्या दालनात निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) विलास पी. देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी याप्रश्नी कोल्हापूर जनशक्ती या संघटनेने आंदोलन केले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून या प्रश्नांसह चार मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.‘कोल्हापूर जनशक्ती’चे समीर नदाफ म्हणाले, शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान शिबिरात अथवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास (ब्लड डोनर कार्ड) देण्यात येते. पण, काही खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तदाता कार्ड घेऊन येणाऱ्या नागरिकांना विविध नियम सांगून त्यांच्याकडून नाममात्र शुल्क वजा करून त्या रक्ताचे पैसे घेण्याचे प्रकार होत आहेत. रक्तांचे दर विविध रक्तपेढीत वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी ३०० रुपये, तर ४०० रुपये घेतले जातात, तर काही ठिकाणी रक्त पूर्णपणे मोफत दिले जाते, अशी उदासीनता का ? सर्व रक्तपेढ्यांमध्ये सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यासाठी एकच दर असावेत. त्याचबरोबर रक्तपेढ्यांच्या प्रशासनाने रोजच्या-रोज रक्तसाठ्याचा फलक लावावा व राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून (एस.बी.टी.सी.) रक्तपेढ्यांबाबत काय मार्गदर्शक सूचना आहेत, त्याची माहिती सीपीआर प्रशासनाने मागवावी व परिषदेकडे पत्रव्यवहार करावा, असे समीर नदाफ यांनी सांगितले.त्यावर विलास पी. देशमुख यांनी रक्तपेढ्यांना काय नियम लागतात याची माहिती एस.बी.टी.सी.कडून घेतली जाईल, त्याचबरोबर खासगी रक्तपेढ्यांच्या कीट अनुदानाबाबत पत्रव्यवहार करू, ठराविक कालावधीत सर्व रक्तपेढ्यांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्याच्या सूचना करू तसेच रक्तदाता कार्डधारकांना त्वरित रक्त द्यावे, असे देशमुख यांनी सांगितले. बैठकीस अमरनाथ पाटील, डॉ. अर्जुन सुतार, प्रीती रजपूत, प्रकाश घुंगुरकर, संदीप तोंदले, डॉ. आर. सी. चिंचणीकर, डॉ. नकाते, डॉ. बागडी, जीवन ढेरे या रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींसह तय्यब मोमीन उपस्थित होते.(प्रतिनिधी)