कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या शंभर कारनाम्यांची माहिती देणारी पत्रके घरोघरी वितरीत करत भाजपच्यावतीने ‘महाविकास आघाडीला जाब विचारूया, जनतेशी संवाद साधुया’ हे अभियान गुरूवारी कोल्हापुरात राबविण्यात आले.
महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरभर कार्यकर्त्यांनी हे अभियान राबवले. समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या बेबंद, बेधुंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे. राज्यात असुरक्षिततेचे, निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांवरच घोटाळे, बलात्कार असे आरोप होताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरच पोलीस खात्याकडून शंभर कोटीची खंडणी घेतल्याचा आरोप यांचा या पत्रकामध्ये समावेश आहे.
भाजपतर्फे सात मंडले, आघाडी व मोर्चे यांचे संयोजकांनी स्वतंत्रपणे हे अभियान राबवले. गणेश देसाई, संतोष माळी, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, प्रदीप पंडे, अजित ठाणेकर, डॉ. राजवर्धन, जासूद, विजय जाधव, मारुती भागोजी, विवेक कुलकर्णी, अतुल चव्हाण, अप्पा लाड, विशाल शिराळकर, भरत काळे, दिलीप मेत्राणी, आशिष कपडेकर, प्रदीप उलपे, विजय खाडे-पाटील, विवेक वोरा, गायत्री राऊत, राधिका कुलकर्णी, विजय आगरवाल, आनंद पेंडसे, सागर अथणे, संजय शिरगावे, निहाल खान, श्रेयस पाटील यावेळी उपस्थित होते.
undefined