शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंसाठी उद्योगजगताचे ‘सामाजिक उत्तरदायित्त्व’

By admin | Updated: January 2, 2017 00:29 IST

क्रीडासंवर्धन, संस्कृतीची जोपासना : अर्थसाहाय्य, विमा संरक्षण, संघ, खेळाडूंना दत्तक घेणार

सचिन भोसले ल्ल कोल्हापूरसमाजातील विविध क्षेत्रांना आर्थिक मदत व विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे बळ देण्याच्या उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर)चा क्रीडाक्षेत्रालाही लाभ करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योजकांचा पैसा खेळ आणि खेळाडूंवर खर्च करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातून चांगले खेळाडू देशाला मिळणार आहेत.केंद्र सरकारने कंपनी अधिनियम २०१३ कलम १३५ नुसार पाच अब्जांपेक्षा निव्वळ मूल्य असलेल्या व १० अब्जांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या किंवा पाच कोटी रुपये निव्वळ नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील दोन टक्के रक्कम सामाजिक कार्याकरिता वापरणे बंधनकारक केले आहे. कें द्राने यात अधिसूचना काढत ग्रामीण खेळ, राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त खेळ, पॅरॉलिम्पिक खेळ आणि आॅलिम्पिक खेळाच्या संवर्धनासाठी पायाभूत क्रीडा सुविधा प्रकल्प व त्यांची देखभाल यांचाही समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला अनुसरून राज्याच्या क्रीडा धोरणातही सुधारणा केली असून, त्यात ‘सीएसआर’ अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा समावेश केला आहे. त्यात क्रीडासंवर्धन, संस्कृतीची जोपासना केली जाणार आहे. याशिवाय क्रीडासंकुलाला अद्ययावत साहित्य उपलब्ध करणे, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, निपुणता केंद्र, क्रीडा वैद्यकीय केंद्र, देखभाल व दुरुस्ती, विविध खेळ स्पर्धा आयोजन, उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी अर्थसाहाय्य करणे, संघ किंवा खेळाडूंना दत्तक घेणे यांचा समावेश आहे.विशिष्ट आहार, त्यांना खेळताना झालेल्या दुखापतीसाठी विमा संरक्षण, खेळाडूंना देशासह परदेशांतही पाठविण्यासाठी तरतूद या धोरणात आहे. पारितोषिक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती व प्रशिक्षकांना प्रशिक्षण वाढीसाठी प्रोत्साहन देणे, आदींची समावेश आहे.समन्वयासाठी जिल्हा पातळीवर समिती‘सीएसआर’अंतर्गत कंपन्यांचा सहभाग वाढण्यासाठी प्रकल्पांचा समन्वय आणि नियंत्रण याकरिता राज्य पातळीवर शालेय शिक्षण व क्रीडा खात्याचे प्रधान सचिव यांच्या, तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे.