शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग बदलाला ‘एनओसी’ नाही

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

भूषण गंगराणी : नव्या उद्योगाबाबत कळविणे बंधनकारक

कोल्हापूर : एखादा उद्योग बंद करून त्याठिकाणी दुसरा उद्योग सुरू करण्यासाठी ‘एमआयडीसी’च्या ‘ना-हरकत प्रमाणपत्रा’ची (एनओसी) अट रद्द करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी याबाबत कळविणे बंधनकारक राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी आज, सोमवारी येथे सांगितले.उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि जिल्ह्यातील उद्योजकांसमवेतच्या बैठकीत ते बोलत होते. गगराणी म्हणाले, शिरोली, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होत आहेत. एखादा उद्योग बंद करून त्याठिकाणी दुसरा उद्योग सुरू करण्यासाठी ‘एनओसी’ची अट ‘रेड कॅटगरी’वगळता अन्य उद्योगांसाठी रद्द केली आहे. ‘फायर एनओसी’ची प्रक्रिया सुटसुटीत होण्यासाठी ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ऐवजी ‘एरिया’ असा निकष केला असून त्याचा उद्योजकांना फायदा होईल. ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत परवाने कमी केले आहेत. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरबाबत लवचिकता तपासणी केली जात आहे. ‘एफएसआय’ वाढविल्याने ग्राऊंड कव्हरेज वापरण्यावरील अटी शिथील केली असून त्यासाठी मार्जिनल स्पेस मेंटेनन्स् करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)विकासवाडीसाठी मदत व्हावी...कोल्हापुरातील विकासवाडी येथील औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याठिकाणी काही शेतकरी तयार, काहींचा विरोध असल्याचे गगराणी यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांशी समन्वय साधण्यासह भूसंपादनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदत करावी तसेच उद्योजकांना धमकावणे, त्यांच्यावर दबाव टाकण्याची पुण्याच्या उद्योग परिसरातील घातक संस्कृती कोल्हापुरात येऊ लागली आहे. ही संस्कृती रोखण्यासाठी देखील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.‘फाईव्ह स्टार’साठी विनादंड मुदतवाढकागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील ‘जी’ ब्लॉकमध्ये एक वर्ष विनादंड मुदतवाढ देण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसाठी आवश्यक व कुशल मनुष्यबळ विकासासाठी प्रशिक्षण संस्था, उपक्रम राबविण्याचा विचार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाईल.