शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाला ‘डिजिटल’ची जोड आवश्यक: मनोज कोटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:43 IST

कोल्हापूर : विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्यामुळे बदलत्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवण्यासह तो वाढवायचा असल्यास त्याला ‘डिजिटल मार्केटिंग’ची जोड देणे आवश्यक आहे. उद्योजक, व्यावसायिकांनी आॅफलाईन आणि आॅनलाईनमध्ये समतोल साधून कार्यरत राहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज कोटक यांनी रविवारी येथे केले.येथील आयटी ...

कोल्हापूर : विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्यामुळे बदलत्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवण्यासह तो वाढवायचा असल्यास त्याला ‘डिजिटल मार्केटिंग’ची जोड देणे आवश्यक आहे. उद्योजक, व्यावसायिकांनी आॅफलाईन आणि आॅनलाईनमध्ये समतोल साधून कार्यरत राहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज कोटक यांनी रविवारी येथे केले.येथील आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरतर्फे आयोजित लाईव्ह आयटी फोरममध्ये ‘डिजिटल मार्केटिंग २.०’ या विषयावर कोटक यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असो.च्या माधवराव बुधले सभागृहातील या कार्यक्रमास ‘आयटी असोसिएशन’चे अध्यक्ष ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष विश्वजित देसाई प्रमुख उपस्थित होते. कोटक म्हणाले, डेस्कटॉप ते स्मार्टफोन आणि ई-मेल ते व्हॉट्स अ‍ॅपपर्यंत तंत्रज्ञान येऊन पोहोचले आहे. तंत्रज्ञानातील बदलामुळे उद्योग-व्यवसायाचे स्वरूपही बदलत असून, नव्या संधीही मिळत आहेत. या संधी साधण्यासह प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी उद्योग-व्यवसायाला डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंगची जोड आवश्यक आहे. कार्यक्रमास ‘आयटी असोसिएशन’चे सचिव प्रसन्न कुलकर्णी, खजानीस स्नेहल बियाणी, कौस्तुभ नाबर, मनीष राजगोळकर, संजीव शिवापूरकर, गिरीश आरेकर, आदी उपस्थित होते. अद्वैत दीक्षित यांनी स्वागत केले. विक्रांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रणजित नार्वेकर यांनी आभार मानले.भीती नव्हे, गरजभीती घालत नाही; पण तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांतील बदल पाहता डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंग अंगीकारणे गरजेचे असल्याचे कोटक यांनी सांगितले. ते म्हणाले, केवळ हे तंत्रज्ञान, मार्केटिंग अंगीकारून चालणार नाही, तर त्यामध्ये अद्ययावत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या विषयाबाबत दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून मी आतापर्यंत मुंबई, पुणे, बडोदा, सांगली, कोल्हापूरमध्ये मार्गदर्शन केले आहे.उद्योजक, व्यावसायिकांनी हे करावेसर्वांत पहिल्यांदा आपल्या उद्योग-व्यवसायाचे संकेतस्थळ तयार करावे.संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात राहावे.गुगल, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, आदींमधील बदल वेळोवेळी जाणून घेऊन अद्ययावत राहावे.डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंग लक्षात घेऊन आपलेउद्योग-व्यवसायाचे धोरण ठरवावे.हे धोरण ठरविताना दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून राहू नये.