शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

उद्योगी आणि कष्टकरी स्वकुळ साळी समाज

By admin | Updated: May 11, 2015 01:07 IST

मूळचा काशी, पैठणचा : कोल्हापुरात साधारणत: तीन, तर इचलकरंजीत १५ हजार समाजबांधव

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूर समाजव्यवस्थेमधील बारा बलुतेदारांपैकी एक स्वकुळ साळी समाज भगवान जिव्हेश्वर यांना आद्यदैवत मानणारे आणि वस्त्र निर्मितीत अग्रेसर असलेल्या स्वकुळ साळी समाजाने कालानुसार उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. फौंड्री उद्योग, व्यापार, व्यवसायात व्यस्त असलेल्या या समाजाने कोल्हापुरात आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटविला आहे. स्वकुळ साळी समाज कोल्हापुरात फारसा परिचित नसला, तरी सोलापूर, पुणे यासारख्या शहरांत या समाजबांधवांची मोठी लोकसंख्या आहे. हा समाज मूळचा काशी आणि पैठणचा. आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांचा शंकराच्या जिव्हेवर जन्म झाला म्हणून त्यांना जिव्हेश्वर म्हणतात, अशी एक आख्यायिका आहे. श्रावण त्रयोदशीला भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. समाजासाठी ते वस्त्रप्रावरणे निर्माण करत. त्यामुळे या समाजाचा वस्त्र, विणकाम, हातमाग हा मुख्य व्यवसाय राहिला. कष्टकरी समाज अशी मुख्य ओळख पूर्वीच्या काळी हाताने वस्त्रे विणावी लागत. त्यामुळे घरोघरी हा व्यवसाय केला जात असे. कालांतराने हातमागाची नवनवीन साधने उपलब्ध झाली. स्वातंत्र्यानंतर यंत्रसामग्री आल्याने कारखानदारी सुरू झाली. त्यामुळे हा व्यवसाय हळूहळू बंद पडू लागला. त्यामुळे उत्पन्नाची अन्य साधने शोधली गेली, त्यातून स्थलांतर झाले. अशारितीने स्वकुळ साळी समाज कोल्हापुरात स्थायिक झाला. पूर्वी शनिवारपेठेतील साळी गल्लीत समाज बांधव राहात. मात्र, येथून छत्रपतींचा रथ जाताना वही पांजणीमुळे अडथळा होत असे, त्यामुळे १९४०-४५च्या दरम्यान छत्रपती संस्थानाने समाजाला राजारामपुरीत जागा दिली. कोल्हापूर शहरात समाजाची नोंदणी १९५० साली झाली. जिल्ह्यातील नोंदणी १९८५ साली झाली. कोल्हापूर, इचलकरंजीसह रेंदाळ, हुपरी, वडगाव, कोडोली, घोटवडे या ठिकाणीही समाजबांधव आहेत. राजाराम पैठणकर, लक्ष्मण ढवर, बळवंतराव मुदगल यांनी त्याकाळी समाजाची धुरा सांभाळली होती. समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गुणवंतांचा सत्कार, महिला व लहान मुलांच्या विविध स्पर्धा, असे उपक्रम राबविले जातात. साठ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महत्त्वाची आर्थिक मदत केली जाते. समाजाचे महिला मंडळदेखील असून, वंदना दुधाणे या अध्यक्षा आहेत. मंडळाच्यावतीने महिलांसाठी भिशी चालविली जाते.