शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्राला मनुष्यबळ पुरविणार

By admin | Updated: May 18, 2016 00:44 IST

देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठ-इंडो जर्मन टूल रूम यांच्यात सामंजस्य करार; आवश्यक शिक्षण देणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्राला इंडो जर्मन टूल रूमच्या सहकार्याने पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल्स रूम (आयजीटीआर) यांच्यात सामंजस्य मंगळवारी करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहातील कार्यक्रमास ‘आरजीटीआर’चे व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. अजित थेटे, जी. एस. कुलकर्णी, गोपाळ बेलूरकर प्रमुख उपस्थित होते.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘आयजीटीआर’च्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण विद्यापीठामध्ये दिले जाईल. त्याचे प्रशिक्षण आयजीटीआर येथे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देण्यात येईल. उद्योग व्यवस्थेने कोणत्या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे ते विषद करणे आवश्यक आहे. यावेळी हेमंत कापसे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविणे हा संबंधित सामंजस्य कराराचा एक भाग आहे. त्यासह उद्योग क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानामुळे सातत्याने होणारे बदल हे तळागाळांतील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल. विद्यार्थ्यांना विविध तंत्रकौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास उद्योजक मोहन घाटगे, प्रताप पुराणिक, राज पाटील, आदी उपस्थित होते. उद्योग तंत्र संस्था आंतरक्रिया कक्षाचे समन्वयक हर्षवर्धन पंडित यांनी प्रास्ताविक केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे समन्वयक अजित कोळेकर यांनी आभार मानले.प्रशिक्षण द्यावेया कराराअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांतील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कौशल्य देण्यावर भर द्यावा तसेच सध्या कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांना प्रशिक्षण देण्याचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली. या करारांतर्गत विद्यापीठातील संशोधकांसाठी औरंगाबाद येथे प्रगत संशोधनाची सोय, नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य प्रशिक्षण व विकास, आदी संयुक्त प्रकल्पांवर काम केले जाणार आहे, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.