शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रिया तिसऱ्या दिवशी हाऊसफुल्ल

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

उद्योजकांचा प्रतिसाद : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानांचे दर्शन

कोल्हापूर : लहान नटबोल्ट ते तब्बल ६६ लाखांच्या हायड्रोलिक एक्सलेटर (पोकलँड) पर्यंतचा समावेश असलेल्या ‘इंडस्ट्रिया २०१४’ प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, सोमवारी औद्योगिक वसाहतींची साप्ताहिक सुटी असल्याने उद्योजक, कर्मचाऱ्यांनी औद्योगिक, उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी, पाहण्यासाठी गर्दी केली होती.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, अर्थमुव्हिंग असोसिएशन, क्रिएटिव्हज् आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रिया २०१४’चे आयोजन केले आहे. येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावरील या प्रदर्शनात औद्योगिक, उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानांचे दर्शन घडत आहे. यात ६६ लाखांचा हायड्रोलिक एक्सलेटर, आठ लाखांचा मिनी रोबट सॅडप्लॅन, बारा प्रकारच्या विटा तयार करणारे मशीन, तसेच वेदनाशामक असणारे २२ हजार रुपयांचे मशीन, स्लॅप फोडणारे दीड लाखांचे कटर, आदींचा समावेश आहे. सांगलीतील राजारामबापू इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सायकल लक्ष्यवेधक ठरत आहे. चालविण्यास सुलभ व आरामदायी अशी तिची रचना केली आहे. नेहमीच्या सायकलींपेक्षा तिच्या चाकांमध्ये अधिक अंतर आणि ती जास्त लांब आहे. जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित वसाहत, शिवाजी उद्यमनगर, आदी औद्योगिक वसाहतींमधील उद्योग, कंपन्यांनी उत्पादित केलेली यंत्रे प्रदर्शनात आहेत. त्यातून कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादनांची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रदर्शनाला भेट दिलेल्या आमदार महाडिक यांचे स्वागत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने व अर्थमुव्हिंग असोसिएशनचे भैयासाहेब घोरपडे यांनी केले. यावेळी रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजित भोसले, क्रिएटिव्हजचे सुजित चव्हाण, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : अमल महाडिक‘इंडस्ट्रिया’ हे प्रदर्शन आधुनिक औद्योगिक जीवनशैलीशी नाते सांगणारे आहे. त्यातून कोल्हापुरातील उद्योजकांनी या नव्या औद्योगिक उपकरणांचा वापर करून उत्पादन कमी खर्चात दर्जेदार बनविण्याची संधी घ्यावी. उद्योजकांना सवलती मिळाव्यात, यासाठी विधी मंडळात प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी यावेळी दिली. ‘इंडस्ट्रिया’ला त्यांनी आज भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापुरात पहिल्यांदाच इतक्या व्यापक स्वरूपात आयोजित केलेले प्रदर्शन उद्योगविश्वाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.