निपाणी : रायबाग तालुक्यातील कुडची येथे स्वयंपाक गॅस मिळविण्यासाठी नागरिकांनी १५ दिवसांपासून नंबर लावूनही सिलिंडर मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी विरुद्ध नागरिकांनी आंदोलन करून संताप व्यक्त केला. नागरिकांनी गावाच्या बाहेरील गॅस वितरण केंद्रासमोरच सिलिंडरनेच भारताचा नकाशा काढून आनोख्या पद्धतीने आंदोलन केले. कुडची येथे इंडियन गॅस, भारत गॅस आणि इतर कंपन्यांचे सुमारे दहा हजार ग्राहक आहेत. स्वयंपाक गॅस मिळविण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून रात्रंदिवस थांबून रांगा लावल्या आहेत. तरीही त्यांना अद्याप सिलिंडर मिळालेले नाही. रायबाग साखर कारखाना संचालक महमुद्दीन चमनशेख, रायबाग पीएलडी बँकेचे संचालक इजाज बिच्चू, मुस्ताक चमनशेख, बाहुबली रक्तू, मनसूर मारू, नजिर चमनशेख, मल्लू हुंचिमारी, अशोक यादव, महावीर बागेवाडी, बाबू घस्ते, रामू दळवाई, कासर नगारजी, चंदाबाई जाधव, लक्ष्मीबाई वाघमोडे यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सिलिंडरनी केला भारताचा नकाशा
By admin | Updated: September 27, 2014 00:57 IST