शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यातून भारतने केले स्वत:चेच कुटुंब उद्ध्वस्त

By admin | Updated: September 11, 2016 00:27 IST

चौघींच्या खुनाने जत तालुका हादरला : संसाराची असफल कहाणी--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

जयवंत आदाटे/संजयकुमार गुरव -- जत/डफळापूरवारकरी संप्रदायातील माळकरी भारत इरकर याने शनिवारी कुडणूर येथे आई, पत्नीसह दोन मुलींची हत्या केल्याने जत तालुका हादरला. जमिनीच्या खटल्यातून आलेला आर्थिक तणाव, त्यातून आलेले वैफल्य की आणखी काही हे तपासावे लागणार आहे.कुडणूर गाव जतपासून सुमारे पंचवीस व डफळापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावची लोकसंख्या दोन हजार आहे. गावातील नागरिकांचा डफळापूरशी सतत संपर्क असतो. हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत आहे. शेती, शेतमजूर व ऊसतोडणी कामगार म्हणून येथील नागरिक काम करतात. कुडणूर, शिंगणापूर, डफळापूर या तीन गावांदरम्यान हाक्के वस्ती आहे. येथील नागरिकांचा कुडनूर गावात समावेश असला तरी, दैनंदिन व्यवहार तीनही गावात चालतात. हाक्के वस्ती मुख्य रस्त्यापासून आडवळणी आहे. तेथे भारत कुंडलिक इरकर हा आई सुशीला कुंडलिक इरकर, पत्नी सिंधूताई भारत इरकर, मुलगी रूपाली, राणी, मुलगा म्हाळाप्पा व आकाश असे सातजण राहात होते.भारतचे वडील कुंडलिक इरकर यांची येथे सुमारे ९० एकर जमीन होती. एकेकाळी ते परिसरातील मोठे जमीनदार होते. त्यांनी सहा लग्ने केली होती. त्यापैकी चार पत्नींचा मृत्यू झाला असून, त्यांना अपत्य नव्हते. जनाबाई (वय ७०) ही सावत्र आई व सुशीला (६५) ही सख्खी आई या दोघीजणी हयात आहेत. जनाबाई सांगली येथे विभक्त राहतात. शेतजमिनीच्या वादातून जनाबाई व भारत यांच्यात मागील तीस वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू आहे. त्यापैकी प्रत्येकवेळी थोडी-थोडी जमीन विकून भारत याने न्यायालयीन कामासाठी पैसे खर्च केले आहेत. जनाबाई यांना न्यायालयातून जमीन मिळाली आहे. सध्या भारत याच्या नावे आठ एकर व त्याच्या मुलाच्या नावे आठ एकर शेतजमीन आहे. अत्यल्प प्रमाणात पाऊस असल्याने शेतजमिनीतून कमी प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. जमीन विकून न्यायालयीन कामासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले तरीही निकाल आपल्याविरोधात गेला. न्यायालयात काढण्यात आलेले वॉरंट त्यामुळे घरदार, शेतजमीन व कुुटुंब असूनही फरारी होऊन भारत इरकर फिरत होता. अधून-मधून आणि रात्री-अपरात्री त्याचा घरी गुपचूप वावर असायचा. तो आर्थिक तणावाखाली होता. यातून त्याने आई, पत्नी आणि दोन मुलींचा एकाचवेळी खून केला. या प्रकारामुळे संपूर्ण जत तालुका हादरला आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी डफळापूर येथे काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण व त्यांची पत्नी शैलजा चव्हाण यांचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी याच परिसरात चारजणांचे हत्याकांड घडले. भारत इरकर याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्याची दोन मुले आता पाठीमागे राहिली आहेत. ‘मी स्वत: कोयत्याने वार करून चौघींची हत्या केली आहे’, असा जबाब भारत याने पोलिसांना दिला असला तरी, या हत्याकांडामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.