शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

अपक्षांनी फोडलाय मात्तबरांना घाम

By admin | Updated: October 28, 2015 00:42 IST

प्रचार शिगेला : कॉलन्यांमधील मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

कळंबा : साळोखेनगर, सुर्वेनगर, राजलक्ष्मीनगर या तीन प्रभागांच्या एकत्रिकरणातून नव्याने आपटेनगर-तुळजाभवानी प्रभाग निर्माण करण्यात आला. नऊ उमेदवारांनी लढतीत वेगळाच रंग भरलाय, तर ताकदवान अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांना घाम फोडलाय. सर्वसाधारण आरक्षणाच्या प्रभागातील लढतीचा निकाल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. राष्ट्रवादीकडून गौरव सावंत, भाजपकडून संगीता सावंत, काँग्रेसकडून महेश गायकवाड, शिवसेनेकडून संजय राणे, रासपकडून रवींद्र राऊत, तर राहुल काळे, राजू दिंडोर्ले, अशोक सावंत, धीरज शिंदे हे अपक्ष रिंगणात आहेत. स्वच्छ चारित्र्याचा, व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर गौरव सावंतला राष्ट्रवादीने रिंगणात आणले आहे. पदयात्रा, रॅली, विकासकामांचा जाहीरनामा वाटप, मंडळे, युवकांची मोट बांधून तो प्रचारात आहे. साळोखेनगर प्रभागात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांशी वैयक्तिक संपर्कावर भर देत काँग्रेसचे महेश गायकवाड प्रचारात आहेत. शिवसेनेचे संजय राणे यांनी घर टू घर प्रचारात आघाडी घेतली आहे. विद्यमान नगरसेविका संगीता सावंत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांनी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने राहुल काळे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे त्यांनी सामाजिक उपक्रमांचा राबता प्रभागात ठेवला होता. त्यांनीही मतदारांशी थेट संपर्काद्वारे प्रचार सुरू ठेवलाय. अपक्ष राजू दिंडोर्ले यांनी स्वखर्चातून प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय सुविधा, महाआरोग्य मेळावा, धूर फवारणी यंत्रे, सफाई कर्मचारी नेमून निवडणुकीपूर्व विकासकामे केलीत. युवा मंडळांची मोट बांधून ते प्रचारात कार्यरत आहेत. ‘रासप’कडून रवींद्र राऊत, तर अपक्ष अशोक सावंत, धीरज शिंदे यांनी वैयक्तिक संपर्कावर जोर देत प्रचार सुरू ठेवलाय. प्रभागात मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन मते वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुळजाभवानी, संतोष कॉलनी, गणेश कॉलनी, अयोध्या कॉलनी या ज्याच्या पाठीशी तो विजयी होणार हे निश्चित. उमेदवारांसह नेते प्रभागात पदयात्रा, कॉर्नर सभा, रॅली घेताहेत. अपक्षांसह सर्वचजण तगडे उमेदवार आहेत. मंडळांचा पाठिंबा व अर्थकारणात यशाचे गुपित दडलंय.