शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करणार : नवाळे

By admin | Updated: August 5, 2015 00:04 IST

बालवाडी शिक्षिकांचा वेतनप्रश्न : पालकमंत्र्यांनी चेष्टा केल्याचा आरोप

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमची चेष्टा केली आहे. शासनाने बैठक घेऊन बालवाडी शिक्षिका सेविकांबाबत वेतन सुरू करण्याबाबत ठोस निर्णय न देल्यास १५ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य बालवाडी शिक्षिका सेविका महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंजली नवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बालवाडी शिक्षिका, सेविकांना शासनाकडून वेतन मिळावे, विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, निश्चित अभ्यासक्रम असावा, शिक्षण सेविकांना सेवा शाश्वती मिळावी, सर्व बालवाड्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ मार्चला आमरण उपोषण करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १४ मेपर्यंत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक घडवू, असे लेखी आश्वासन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यामार्फत २९ मार्चला महासंघाला दिले होते. त्यानुसार आमरण उपोषण मागे घेण्यात आले पण त्यानंतर पालकमंत्र्यांंना या गोष्टीचा विसर पडला. पावसाळी अधिवेशन संपले तरी अजूनही याप्रश्नी बैठक घेण्याची कोणतीच सूचना दिलेली नाही किंवा आमची दखल कोणी घेतली नाही. पालकमंत्र्यांनी आमची चेष्टा केली आहे. त्यामुळे १५ आॅगस्टपूर्वी आमच्या मागण्यांबाबत शासनाच्यावतीने बैठक घेतली नाही तर पंधरा आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व बालवाडी शिक्षिका व सेविकांच्यावतीने सामूहिक आत्मदहन केले जाईल. (प्रतिनिधी)सेवा शाश्वतीची मागणीजिल्ह्यात एकूण चार हजार ५०० शिक्षिका व सेविका आहेत, तर राज्यात वीस हजार शिक्षिका व सेविका आहेत. त्यांना किमान पाच हजार रुपये वेतन मिळावे तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा. यासह सेवा शाश्वती मिळावी, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.