लोकमत न्यज नेटवर्क, कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर मल्हारपेठ शाळेत रविवारी विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
प्रथम कमल आनंदा महाजन, सुनीता उत्तम सातपुते, अर्जना पांडुरंग पाटणकर, राणी सागर मोरे, राणी सुरेश साठे, प्रफुल्ल प्रकाश नारकर, संतोष शंकर नारकर, परशुराम सातपुते, जवान सुनील पाटील या कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांकरिता भाषण, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी गावचे सरपंच, उपसपंच, शाळेचे मुख्याद्यापक थोरवत, कविता दुधाणे, शैलजा पाटील, गुरव उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १७०८२०२१-कोल-मल्हारपेठ शाळा
ओळ - पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ विद्यामंदिरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा झाला.
कसबा बावड्यात मास्क वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कसबा बावडा व्यापारी व्यावसायिक नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या संस्थेचे सेवक संचालक यांना कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटक शंकर मारुती चेचर यांच्या हस्ते मास्क वाटण्यात आले. संस्थेचे चेअरमन उत्तम प्रकाश कामीरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक चेअरमन गजानन बेडेकर, व्हाईस चेअरमन सचिन पाटील ,भानुदास शिंदे, जितेंद्र कांबळे, शामराव करपे, किशोर वारके, मॅनेजर धनाजी उलपे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १७०८२०२१-कोल-कसबा बावडा
ओळ - कसबा बावडा व्यापारी व्यावसायिक नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेता संघटक शंकर चेचर यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.